Raj Thackeray: राज ठाकरेंचा हटके अंदाज, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भारावले
- Published by:Sachin S
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
अंबरनाथमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला
अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वत्र हालचाली सुरू झाल्या आहेत. कुठे पक्षप्रवेश सोहळे सुरू आहे तर कुठे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सोहळे सुरू आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अंबरनाथमध्ये मनसे विद्यार्थी सेना शाखेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी राज ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छा, या चर्चेचा विषय ठरला.
अंबरनाथमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी अंबरनाथ जिल्हा मनसे विद्यार्थी सेना शाखेवर सर्वांत आधी राज ठाकरे यांनी भेट दिली. राज यांनी कार्यालयाची पाहणी केली आणि त्यांनी शाखेच्या मस्टरवर सही करत ठाकरे स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत. राज यांची स्वाक्षरी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
advertisement

'युती आघाडी नंतर पाहू आधी कामाला लागा'
दरम्यान, 'निवडणुकीला लागा, युती आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो. मनसेची आपली ताकद आहे ती आता बळकट करा, असं आदेशच राज ठाकरेंनी यांनी अंबरनाथ येथील मनसे पदाधिकारी बैठकीत मनसैनिकांना आदेश दिले.
तसंच, 'निवडणूक याद्यांवर काम करा. बूथ टू बूथ माणसं निवडा त्यावर काम करा. मतदार याद्या वारंवार चाळा, विघानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला किती मतदान मिळालं आणि शिंदेंच्या पक्षाला किती मतदान मिळालं यावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. मनसेचा मतदार आहे, मनसेला मतदारांनी मतदान केलंय. मशीन मध्ये काय तांत्रिक केले ते माहिती नाही. यासाठी मतदार याद्या चाळा मतदार शोधा आणि ३० सप्टेंबरपर्यंत मला माहिती द्या, असे आदेशही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले.
advertisement
चिमुरडीसोबत फोटोची चर्चा
दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केलं. त्यावेळी या गर्दीत आरोही नावाची मुलगी होती. राज ठाकरे यांना सारखी बोलावत होती, तिला त्यांच्या सोबत एक फोटो काढायचा होता. शेवटी खाली इमारतीच्या पायऱ्यांवर राज ठाकरे या चिमुरडीसाठी थांबले आणि त्यांनी आरोही ला बोलावून घेतलं आणि तिच्यासोबत फोटो काढला. आरोहीने धावत जाऊन राज ठाकरेंच्या समोर उभी राहिली. राज यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली हे पाहून चिमुरडीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
Location :
Ambarnath,Thane,Maharashtra
First Published :
September 19, 2025 5:08 PM IST