Kalyan News: कल्याणमध्ये 'या' ठिकाणी मिळतायत राजस्थानी मातीच्या वस्तू, दुकानामध्ये नागरिकांची झुंबड

Last Updated:

Kalyan News: कल्याणच्या घोलप नगर परिसरातील योगीधामजवळ साबित खान यांनी गेल्या 30 वर्षांपासून पासून रस्त्यावरच दुकान म्हणून मातीच्या अनेक प्रकारच्या वस्तू राजस्थान, गुजरात अन्य ठिकाणाहून आणल्या आहेत. त्यांच्या या मातीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

+
Kalyan

Kalyan News: कल्याणमध्ये 'या' ठिकाणी मिळतायत राजस्थानी मातीच्या वस्तू, दुकानामध्ये नागरिकांची झुंबड

आतापर्यंत आपण अनेक मातीच्या वस्तू वापरल्या परंतु कल्याणच्या घोलप नगर परिसरातील योगीधामजवळ साबित खान यांनी गेल्या 30 वर्षांपासून पासून रस्त्यावरच दुकान म्हणून मातीच्या अनेक प्रकारच्या वस्तू राजस्थान, गुजरात अन्य ठिकाणाहून आणल्या आहेत. त्यांच्या या मातीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळीत त्यांनी लोकांचे आकर्षण वाढावे यासाठी राजस्थानी रांगोळी, पणती, दिवे, पूजेचे हवन भांडे इतर अनेक वस्तू आणल्या असून या रस्त्यावरच्या दुकानात सकाळपासून आपल्याला गर्दी बघायला मिळेल.
मुख्य म्हणजे लोकांच्या आवडी निवडीचा विचार करून साबित हे नेहमी बाहेरून काहीतरी वेगळे आणत असतात. मातीच्या वस्तू घेण्यासाठी पूर्ण मार्केट जरी फिरले तरी साबितच्या दुकानात ज्या वस्तू मिळतात त्या कुठेच नाही असे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मातीच्या वस्तुंसाठी कल्याण योगीधाममध्ये साबित खूप चर्चेत आहेत. त्याचं  योगीधाममध्ये एकच दुकान असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष हे दुकान वेधून घेतो. त्यात झाडांच्या कुंड्या तसेच वेगवेगळ्या छोटी मोठी झाडे सुद्धा त्यांनी विकण्यास ठेवली आहेत.
advertisement
साबितच्या या व्यवसायात त्याचा भाऊ आणि मुलगा त्याला आधार म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीत राजस्थानी रांगोळी, पणती, दिवे, वसुबारससाठी गाई, मडकी, मावळे, शिवाजी महाराज आदी नवनवीन वस्तू त्यांनी विकण्यास आणल्या असून मुख्य म्हणजे कोणतीही पणती घ्या 50ते 60रु डझनवर देत असल्याने ग्राहकांना ही त्याचा फायदा होतो. साबित यांनी छोटी टपरी आणि त्यात छोट्या मातीची कुंडी, झाडे असा सुरू केलेला व्यवसाय आज 30 वर्षात तो व्यवसाय त्यांनी फुलासारखा फुलवलेला आहे.
advertisement
त्यांची ही मेहनत त्यांनी बाहेरून मागवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांची योग्य प्रकारे केलेली मांडणी यावरून नक्कीच बघायला मिळते. त्यांच्या इथे बाजारभावानुसार प्रत्येक वस्तू 20% डिस्काउंटमध्ये मिळत असल्याने, ग्राहकांची मागणी त्यांच्याच दुकानात बघायला मिळते. साबित यांच्यासाठी हा व्यवसाय नसून लोकांच्या सेवेसाठी मी प्रयत्न करतो. भविष्यात अशीच सेवा करीत राहिल. ना नावात आणि भावात बदल होणार. यासाठी दिवाळीमध्ये नक्कीच वेगवेगळ्या मातीच्या वस्तू नागरिकांना या ठिकाणी बघायला मिळतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan News: कल्याणमध्ये 'या' ठिकाणी मिळतायत राजस्थानी मातीच्या वस्तू, दुकानामध्ये नागरिकांची झुंबड
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement