advertisement

Ajit Pawar Plane Crash: VSR च्या रोहित सिंगचं कोणाच्या मदतीने पलायन? रोहित पवारांचा यंत्रणांवर गंभीर आरोप

Last Updated:

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत VSR व्हेंचर्स कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले.

VSR च्या रोहित सिंगचं कोणाच्या मदतीने पलायन? रोहित पवारांचा यंत्रणांवर गंभीर आरोप
VSR च्या रोहित सिंगचं कोणाच्या मदतीने पलायन? रोहित पवारांचा यंत्रणांवर गंभीर आरोप
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत VSR व्हेंचर्स कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे मंत्र्यांसोबत संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. अनियमिता असलेल्या कंपनीच्या मालकाचा मुलगा भारताबाहेर गेला असून कोणाच्या मदतीने पलायन केले असा सवाल रोहित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पु्न्हा पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर सवाल उपस्थित केले. "कंपनीचा मालक रोहित सिंग भारताबाहेर पळाला असून, त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली?" असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
advertisement

केंद्रीय मंत्र्यांचे आणि VSR चे कनेक्शन काय?

रोहित पवार यांनी या अपघाताचा तपास संशयाच्या फेऱ्यात असल्याचे सांगताना काही गंभीर दावे केले आहेत. इतक्या मोठ्या अपघातानंतरही VSR व्हेंचर्स कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख नेते आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज नेते या लग्नाला उपस्थित होते.
advertisement

विमान वाहतूक मंत्र्यांवर निशाणा 

केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांचे VSR कंपनीशी नेमके काय संबंध आहेत? सत्तेतील बरीच माणसे या कंपनीच्या मालकाशी जवळचे संबंध ठेवून आहेत, म्हणूनच ही कंपनी वाचवली जातेय का? असा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित सिंग देशाबाहेर कसा गेला?

रोहित पवार पुढे म्हणाले की, "या प्रकरणाचा मुख्य दुवा असलेला रोहित सिंग भारताबाहेर निघून गेला आहे. सध्या रोहित सिंग हा मियामी येथे असल्याचा दावा त्यांनी केला. अजितदादांच्या विमान अपघाताचा एकीकडे तपास सुरू असल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे मुख्य व्यक्ती देश सोडून जाते, हे कोणाच्या आशीर्वादाने घडत आहे? त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली?"
advertisement

तपासावर प्रश्नचिन्ह

सत्तेतील लोकांची या कंपनीशी असलेली जवळीक पाहता, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होईल का, याबाबत रोहित पवारांनी शंका व्यक्त केली आहे. "तपास केवळ नावापुरता सुरू असून, मूळ सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे," असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: VSR च्या रोहित सिंगचं कोणाच्या मदतीने पलायन? रोहित पवारांचा यंत्रणांवर गंभीर आरोप
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement