advertisement

रोहित पवारांचे 'डिटेक्टिव्ह' मिशन! गुप्तहेरांच्या मदतीने दादांच्या अपघाताचं 'ते' भयानक सत्य बुधवारी बाहेर येणार? काऊंटडाऊन सुरू

Last Updated:

सरकारी तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करत नसल्याने रोहित पवार यांनी  तपास करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे  

News18
News18
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात पहिल्याच पत्रकार परिषदेत एकामागून एक गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. बुधवारी (18 फेब्रुवारी) सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बहुचर्चित पत्रकार परिषद होणार असून, या वेळी रोहित पवार कोणती नवी माहिती समोर आणणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळेपासून ते विमान कोसळण्यापर्यंतच्या घटनाक्रमावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अपघात नेमका कसा झाला, सुरक्षेत त्रुटी होत्या का, काही गोष्टी दडपण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची झाले होती. त्यानंतर या प्रकरणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे.
advertisement

राज्याचं लक्ष पत्रकार परिषदेकडे

याच पार्श्वभूमीवर रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिल्या परिषदेत केलेल्या गौप्यस्फोटांनंतर आता आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघातामागील खरे कारण, घटनास्थळी उपस्थित असलेले लोक, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, तसेच काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा आणि पुराव्यांचा तपशील रोहित पवार समोर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करत नसल्याने रोहित पवार यांनी  तपास करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे
advertisement

पत्रकार परिषदेतून कोणते नवे गौप्यस्फोट होणार? 

ही पत्रकार परिषद केवळ माहितीपुरती मर्यादित न राहता, सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अपघातावरून आधीच निर्माण झालेल्या संशयाच्या धुरळ्यात ही नवी परिषद आणखी खळबळजनक ठरू शकते.   रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतून कोणते नवे गौप्यस्फोट होणार, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे परवा सकाळी होणारी ही पत्रकार परिषद केवळ औपचारिक न राहता, राज्याच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
advertisement

गुप्तहेरांची देखील घेणार मदत

दरम्यान  रोहित पवार गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. राजधानी दिल्लीत त्यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली. यातील एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचं काम दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी तपास यंत्रणांवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी हे खासगी गुप्तहेर संस्थांकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहित पवारांचे 'डिटेक्टिव्ह' मिशन! गुप्तहेरांच्या मदतीने दादांच्या अपघाताचं 'ते' भयानक सत्य बुधवारी बाहेर येणार? काऊंटडाऊन सुरू
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement