सक्षमच्या हत्येआधीचा VIDEO, आंचलसह तिच्या वडीलांसोबत केला भन्नाट डान्स, मग असं काय घडलं अन् खून झाला?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आंतरजातीय प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय तरुण सक्षम ताटेच्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. प्रेयसीच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची निर्घृण हत्या केली. यातील मयत आणि मारेकऱ्यांचा जुना व्हिडीओ समोर आला आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: आंतरजातीय प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय तरुण सक्षम ताटेच्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. प्रेयसीच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना उघडकीस येताच सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं आहे. आयुष्यभर सक्षमला साथ देणार, त्याच्या कुटुंबीयांसोबत राहणार, असा निर्णय आंचलने घेतला आहे.
या सगळ्या घटनाक्रमानंतर आता आंचल, तिचे वडील गणेश मामीडवार आणि सक्षम ताटे या तिघांच्या डान्सचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिघेही भीमजयंतीच्या मिरवणुकीत नाचत आहेत. यावरून सक्षम आणि मामीडवार कुटुंबीयांचे संबंध किती चांगले होते, हे दिसून येत आहे. या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंचलचे वडील गणेश मामीडवार हे गेल्यावर्षी 14 एप्रिल रोजीच्या भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आंचल देखील त्यांच्यासोबत होती. गणेश मामीडवार या मिरवणुकीत सक्षमसोबत नाचले. आँचल आणि सक्षम देखील सोबत या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
advertisement
आता हा व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. समक्षसोबत इतके चांगले संबंध असताना गणेश मामीडवार त्याच्या घात करतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. आंचलने दिलेल्या माहितीनुसार, तिचे दोन्ही भाऊ आणि सक्षम खूप चांगले मित्र होते. यातूनच सक्षमचं आंचलच्या घरी येणं-जाणं होतं. यातूनच तीन वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण या प्रेमाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
December 01, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सक्षमच्या हत्येआधीचा VIDEO, आंचलसह तिच्या वडीलांसोबत केला भन्नाट डान्स, मग असं काय घडलं अन् खून झाला?


