आईसह दोन चिमुकले जागेवर गेले, हेल्मेटमुळे वडील वाचले, काळीज सुन्न करणारा अपघात
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sangali News: सांगलीतील अपघातात आई आणि दोन मुलांनी जागीच जीव गमावला तर वडिलांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्यांचा जीव वाचला.
सांगली : जीप आणि मोटरसायकलच्या धडकेत एका महिलेसह दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला तर मयत महिलेचा पती हा गंभीर जखमी झाला. सांगली तासगाव मार्गावर भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरील चौघांना जोराची धडक दिली.
प्राथमिक माहिती अशी की, सकाळच्या सुमारास कवलापूर कुमठे रोडवरील एस आर पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. अपघातातील मयत भारगुडे कुटुंब हे मुळचे आटपाडी तालुक्यातील तळेगाव येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब सांगलीत राहत होते.
आज सकाळी जखमी विशाल म्हारगुडे हे पत्नी दिपाली मुलगा राजकुमार आणि सार्थक यांच्यासह दुचाकीवरून आटपाडी तळेवाडी येथे लग्न सोहळ्यासाठी चालले होते. कवलापूर कुमठे रोडवर पेट्रोल पंपासमोर अचानक समोरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीला उडवले. यामध्ये स्वतः विशाल हे हेल्मेट घातल्यामुळे जखमी झाले तर पत्नीसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
अपघातानंतर जीप चालकाने तेथून पलायन केले. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींसह सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा केलेला आहे. पोलीस तपास करीत आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमी विशाल यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
December 11, 2024 2:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईसह दोन चिमुकले जागेवर गेले, हेल्मेटमुळे वडील वाचले, काळीज सुन्न करणारा अपघात


