सांगलीत वाढदिवशीच राजकीय नेत्याची हत्या, बर्थडे पार्टीत काय घडलं? हत्येचं कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sangli: सांगलीच्या गारपीर चौक परिसरात घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. आता हत्येच्या रात्री बर्थ डे पार्टीत नक्की काय घडलं? याचा सगळा घटनाक्रम समोर आला आहे.
असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली: सांगलीच्या गारपीर चौक परिसरात घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मुळशी पॅटर्न स्टाईलने घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला आहे. उत्तम मोहिते यांची हत्या करत असताना झालेल्या झटापटीत एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. घटनेच्या रात्री नक्की काय घडलं? याची माहिती आता समोर आली असून हत्येच्या कारणाचा देखील पोलिसांनी खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मयत पावलेले उत्तम मोहिते आणि हल्लेखोर शाहरूख शेख यांच्यात वर्चस्वातून वाद होता. याच कारणातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरासमोर स्टेज टाकून जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
या कार्यक्रमाला आरोपी देखील आला होता. जेवण झाल्यानंतर आरोपींचा मयत उत्तम मोहिते यांच्यासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठ ते दहा आरोपींनी घरात घुसून मोहिते यांना भोसकलं. या हल्ला इतका भयंकर होता की मोहिते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी शाहरूख शेख यांच्यावर देखील प्रतिहल्ला झाला. त्याचाही याच घटनेत मृत्यू झाला आहे. आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर हटके पद्धतीने मोर्चे काढण्यासाठी त्यांची ओळख होती. त्याशिवाय उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. मंगळवारी वाढदिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं की, मोहिते यांनी आपल्या घरासमोरच स्टेज उभारलं होतं. डिजीटल फ्लेक्स लावले होते. जेवणाची पंगत आणि केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता. हे सगळं सुरू असताना उत्तम मोहितेंवर हल्ला करणारे हल्लेखोर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, शुभेच्छा देताना उत्तम मोहिते आणि हल्लेखोरांमध्ये वादावाद झाली.
advertisement
त्यानंतर काही वेळातच आठ ते दहा जणांनी मोहितेवर हल्ला चढवला. सर्वांनी उत्तम मोहिते यांच्यावर घरात घुसून हल्ला केला, हा हल्ला होत असताना यामध्ये हल्लेखोर असणारा शाहरुख शेख याला चाकूचा वर्मी घाव मांडीला बसला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती देखील घुगे यांनी दिली.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 12, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीत वाढदिवशीच राजकीय नेत्याची हत्या, बर्थडे पार्टीत काय घडलं? हत्येचं कारण समोर


