माझ्या बापाला कुणी कुणी... आर आर पाटलांना लक्ष्य करणाऱ्या अजितदादांना लेक रोहित पाटलांचे जोरदार उत्तर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार मंगळवारी तासगावला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आर आर पाटील यांना लक्ष्य केले.
सांगली : आर आर पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत बहुमोलाची साथ देऊनही त्यांनी माझा केसाने गळा कापला. त्यांनीच सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर त्यांनीच सही करून माझी खुली चौकशी करण्यासाठी परवानगी दिली, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तासगावमध्ये बोलताना केली. टीकेनंतर संयमी भूमिका घेऊन अजितदादांचे वक्तव्य आवडत नसल्याचे आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगितले खरे. पण बुधवारी आक्रमक रूप धारण करत माझ्या वडिलांना कुणी कुणी त्रास दिला, हे वेळ आल्यावर नक्की सांगेन, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष उत्तर दिले.
अजित पवार मंगळवारी तासगावला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आर आर पाटील यांना लक्ष्य केले. अजित पवार यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी असलेले आर आर पाटील यांच्यावरील टीकेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असताना आबांच्या लेकाने अजित पवार यांना सूचक इशारा दिला. तासगावच्या ढवळी येथे प्रचार शुभारंभाच्या सभेमध्ये रोहित पाटील बोलत होते.
advertisement
गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी कोणी त्रास दिला, हे मला माहिती आह. योग्य वेळी त्यांना योग्य उत्तर देऊ, अशा शब्दात रोहित आर आर पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. वडील हयात असताना त्यांना मानसिक त्रास काय काय झाला, हे आबांनी त्यांच्या मित्रांना अनेक वेळा सांगितले. आबा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे, हे मला आबांच्या मित्रांनी सांगितलंय. त्यांना त्यांना कुणी त्रास दिला, हे मी योग्यवेळी सांगेन, असे रोहित पाटील म्हणाले.
advertisement
अजित पवार नेमके काय म्हणाले होते?
माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर माझी खुली चौकशी करण्यात यावी, असा शेरा मारून त्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केली होती. आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, असा गंभीर आरोप करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर आर आर पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
आर आर पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत एवढे बहुमोल सहकार्य करूनही त्यांनी केसाने गळा कापला. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच मला आर आर पाटील यांची सही दाखवली, असेही सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2024 5:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
माझ्या बापाला कुणी कुणी... आर आर पाटलांना लक्ष्य करणाऱ्या अजितदादांना लेक रोहित पाटलांचे जोरदार उत्तर


