पाऊण तोळ्याची चोरी, पण DySP थेट घटनास्थळी, सोनं महागल्याचा परिणाम की दुसरंच कारण?

Last Updated:

Sangli News: सांगलीत घरफोडीत पाऊण तोळे सोने चोरीला गेले. मात्र, त्यासाठी थेट डीवायएसपींनाच घटनास्थळी जावं लागलं. याबाबत 1980 चा कायदा महत्त्वाचा आहे.

पाऊण तोळ्याची चोरी, पण ‘डीवायएसपी’ थेट घटनास्थळी, सोनं महागल्याचा परिणाम की दुसरंच कारण?
पाऊण तोळ्याची चोरी, पण ‘डीवायएसपी’ थेट घटनास्थळी, सोनं महागल्याचा परिणाम की दुसरंच कारण?
सांगली: भारतीय न्यायसंहितेमध्ये घरफोडी हा गंभीर गुन्हा मानला जातो. 1980 मध्ये सोन्याचा दर साधारण हजार रुपयांपर्यंत होता. तेव्हापासून 75 हजार रुपयांची घरफोडी झाली, तर 'डीवायएसपी' यांना 'स्पॉट व्हिजिट' करावी लागते; परंतु आता सोन्याचा दरच सव्वालाखापर्यंत पोहोचला आहे. घरफोडीत पाऊण किंवा एक तोळा सोने चोरीला गेले तरी 'डीवायएसपीं'ची घटनास्थळी भेट निश्चित होते. सध्या सोन्याचे भाव अन् घरफोड्याही वाढल्या आहेत. त्यामुळे 'डीवायएसपीं'च्या घरफोडीच्या भेटीही वाढल्या आहेत.
घरफोडीचा गुन्हा चोरीपेक्षा अधिक गंभीर 
घरफोडी हा गुन्हा पोलिस दलात चोरीपेक्षा अधिक गंभीर मानला जातो. 'डीवायएसपी' हे उपविभागाचे प्रमुख असल्याने, अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे की नाही, हे पाहणे त्यांचे कर्तव्य समजले जाते. घटनास्थळीच्या पुराव्यांची पाहणी करण्यासाठी भेट देणे आवश्यक असते. तसेच गुन्हेगारांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, बाहेर कसे पडले आणि कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याची प्रत्यक्ष पाहणी करून तपास अधिकाऱ्यांना त्वरित व अचूक मार्गदर्शन करावे लागते.
advertisement
1980 मधील नियमामुळे घटनास्थळी जावे लागते
वर्ष 1980 मधील पोलीस दलातील सूचनेनुसार घरफोडीमध्ये किमान 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असेल तर 'डीवायएसपी' घटनास्थळी भेट देतात. गेल्या काही वर्षात सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला असून, सव्वा लाखापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे कोणत्याही घरफोडीत पाऊण किंवा एक तोळ्याचा ऐवज चोरीला गेला तरी त्याची किंमत 75 हजारांच्या पुढे जाते. त्यामुळे 'डीवायएसपीं'ना त्वरित घटनास्थळी धाव घ्यावी लागते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
पाऊण तोळ्याची चोरी, पण DySP थेट घटनास्थळी, सोनं महागल्याचा परिणाम की दुसरंच कारण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement