Sanjay Raut : ठाकरे बंधूंमध्ये फोनवरून चर्चा? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मनोमिलन झाल्यानेच...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut On Shiv Sena UBT MNS : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
Shiv Sena UBT-MNS : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे-मनसेतील युतीवरील सस्पेन्स वाढला आहे.
आज मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊतांनी म्हटले की, 'नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरू आहे. सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असेल, असे त्यांनी म्हटले.
फोन झालाही असेल...
मनसे नेते अमित ठाकरे यांनी युतीबाबत दोन भावांमध्ये चर्चा होईल, त्यावर आम्ही काही बोलणार नाही असे म्हटले होते. राज ठाकरे यांचा नंबर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील आहे. त्यामुळे एक फोन करायला हरकत नाही असे म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली देखील असेल. तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना...फळ येण्यासाठी आधी मेहनत घ्यावे लागते. त्यानंतर झाडावर फळ येते. युतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. दोन भावांमध्ये चर्चा होईल, पण या दोन भावांना फोनवर बोलण्यासाठी प्रस्तावाची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
advertisement
माझ्यासाठी 'शिवतीर्थ' कॅफेटेरिया नाही, घर...
अमित ठाकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज यांच्या भेटीसाठी कॅफेटेरियात यावं असं म्हटले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, राज यांचे निवसास्थान आमच्यासाठी ते कॅफेटेरिया नसून घर आहे. कॅफेटेरिया हे इतरांसाठी असल्याचे राऊत यांनी म्हटले. काही महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी राज यांच्या निवासस्थानी भाजप, शिंदे गटाचे नेते जात होते. या भेटी वैयक्तिक असल्याच्या चर्चा असल्याचे सांगण्यात येते होते. त्यावर राऊत यांनी राज यांनी कॅफेटेरिया सुरू केल्याचे म्हटले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2025 11:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : ठाकरे बंधूंमध्ये फोनवरून चर्चा? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, मनोमिलन झाल्यानेच...