Sanjay Raut : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, राऊतांचा सूर नरमला, काय म्हणाले नेमकं?

Last Updated:

Sanjay Raut On Udhav Thackeray-Chandrakant Patil : भाजप-ठाकरे गटाचे मनोमिलन होण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील नरमाईचा सूर आवळला.

उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, राऊतांचा सूर नरमला, काय म्हणाले नेमकं?
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, राऊतांचा सूर नरमला, काय म्हणाले नेमकं?
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपची पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बुधवारी, एका विवाह सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्यानंतर भाजप-ठाकरे गटाचे मनोमिलन होण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील नरमाईचा सूर आवळला.
हिवाळी अधिवेशानादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली होती. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. या घटनेनंतर राज्यात लवकरच भाजप-ठाकरेंची युती होईल, अशी चर्चा रंगली.

संजय राऊत यांनी म्हटले?

उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासून शिवसेना-भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत. विशेषतः शिवसेना-भाजप युतीच्या जुन्या पिढीत चंद्रकांत दादांसारखे नेते होते. आता भाजपमध्ये बाहेरून जे हौशे-नौशे-गौशे आलेले आहेत त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही असेही त्यांनी म्हटले.
advertisement

 भाजपच्या हट्टामुळेच महाविकास आघाडीत...

आम्ही महाविकास आघाडीत सहभागी होण्यातही भाजपच्या काही लोकांचा हट्ट कारणीभूत असल्याचे राऊतांनी म्हटले. आम्ही जे हक्काचे मागत होतो ते पक्ष फोडल्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिले. अमित शाहांनी आमची मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटाळून लावली होती. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती, त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले होते. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
advertisement

विवाह सोहळ्यात नेमंक काय झालं?

भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचा विवाह सोहळा मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडलं. त्या दरम्यान, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला एक संवाद झाल्याचे समोर आले. ज्यात हे तिन्ही नेते भाजप- ठाकरे युतीबाबत चर्चा करताना दिसत आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला एक संवाद समोर आला आहे. ज्यात हे तिन्ही नेते भाजप- ठाकरे युतीबाबत चर्चा करताना दिसत आहेत. या संवाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आलं
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, राऊतांचा सूर नरमला, काय म्हणाले नेमकं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement