नादाला लागू नका, सोडणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेचा बाण

Last Updated:

Sanjay Shirsat: पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला.

अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट
अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागलंय. वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्याविरोधात बोललं जातं. मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरुर घ्या पण आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना दिला. तसेच आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे, त्यामुळे जरा जपून, असा गर्भित इशाराही शिरसाट यांनी दिला
एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात नियु्क्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबरदारीही दिली आहे. त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. या कार्यक्रमाला आमदार आशिष जैस्वाल, आमदार संजना जाधव उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना शिरसाट यांनी जोरदार भाषण ठोकले. राजकीय विरोधकांवर तोंडसुख घेतानाच त्यांनी स्वपक्षीयांवरही टीकेचे बाण सोडले.
advertisement

मंत्री झालो, पालकमंत्री झालो, सगळं स्वप्नवत वाटतंय, आता पालकमंत्री काय असतो हे दाखवतो

एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला, तुला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. शपथ घेताना सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती, हात पाय लटपट कापत होते. शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते. त्यांना माझी अवस्था माहिती आहे. एकवेळ खायला अन्न मिळत नव्हते, तो माणूस आज मंत्री झाला, पालकमंत्री झाला, हे सगळं स्वप्नवत असल्याचे शिरसाट म्हणाले. तसेच पालकमंत्री काय असतो आणि त्याची काय पॉवर असते, हे माझ्या कामातून दाखवून देतो, असेही शिरसाट म्हणाले.
advertisement

यंदा पैसे जास्त लागले पण मी पण हात मोकळा केला

निवडणुकीच्या काळात मला पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. मी कसा पराभूत होईल, यासाठी अनेकांनी डाव रचले. पण त्यांचे डाव मी उधळून लावले. कारण माझं नावच संजय आहे, मला पुढचे दिसते. मी कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेत नाही पण समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. इतर वेळीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्त पैसे लागले पण मीही मोकळा हात केला. मंत्री झालोय, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने पालतमंत्रीही झालोय, पुढची पाचही वर्ष मीच पालकमंत्री राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंतेची गरज नसते, असे शिरसाट म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नादाला लागू नका, सोडणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेचा बाण
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement