Video: "मस्ती आलीय का तुला", संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मतदान केंद्राबाहेरच धमकी; व्हिडीओ व्हायरल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव बाळासाबेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांनी व्हिडीओ शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उस्मानपुरा भागातील मतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. ज्या व्यक्तीला धमकी देण्यात आली ते ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख नितीन पवार आहेत.
advertisement
संजय शितसाट यांचीही कोणती पद्धत बोलायची! या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? #MaharashtraElection2024 #महाराष्ट्र pic.twitter.com/Nz8tMc5TET
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 20, 2024
नेमकं काय घडले ?
समोर आलेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा भागात मतदान केंद्राबाहेर बुथजवळ आमदार संजय शिरसाट यांची गाडी आली. शिरसाटांची गाडी आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिरसाटांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत गायब करून टाकेल असे म्हणाले.
advertisement
वरळीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने
वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते वरळी कोळीवाड्यात मतदारांना भांडी वाटप करत असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेली भांडी पोलिसांना दाखवली. मात्र, पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. वरळी कोळीवाड्यातील या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मतदारांना एक कूपनच्या माध्यमातून भांडी वाटप केले जात असल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात आला आहे. एका घरातून हळदी कुंकूची भेटवस्तू म्हणून शिंदे गटाकडून भांडी वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 20, 2024 3:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: "मस्ती आलीय का तुला", संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मतदान केंद्राबाहेरच धमकी; व्हिडीओ व्हायरल