Santosh Deshmukh Case: अजितदादांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट, म्हणाले...
- Published by:Sachin S
Last Updated:
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली
बीड : बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला. या घटनेला आता वर्षपूर्ण झालं आहे पण अजूनही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आज संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने देशमुख कुटुंबीयांच्या भेटीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. याावेळी त्यांनी वैभवीचा शिक्षणासंदर्भात आणि न्यायालयीन लढाईमध्ये सहकार्य करण्यासंदर्भात चर्चा केली.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय देशमुख आणि वैभवीशी संवाद साधला. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी माहिती दिली.
"आमच्या भावाचा खून झाला, त्यानंतर त्यांनी जिल्ह्याची परिस्थिती काय आहे त्याबाबत चर्चा केली. पुढे वेळ भेटला आणि वेळ आली तर आम्ही निवेदन देखील देऊ. आम्ही आज काही जास्त बोललो नाही. आज दुखाचा दिवस आहे. त्यामुळे फार काही बोलणं झालं नाही, जेव्हा निरोप येईल तेव्हा भेट घेणार आहोत. आता त्यांना कधी वेळ मिळतो, तसा ते निरोप देतील त्यावेळी जाणार आहे, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
advertisement
तसंच. 'न्यायालयीन प्रकरणामध्ये काही अडचण असेल, काही मदत लागत असेल तर त्याबद्दल विचारणा केली. पण, आम्ही दादांना सांगितलं. ज्यांनी खून केला त्यांनी पाप केलेले आहे. त्यांना शिक्षा व्हायला हवी. कारण, त्यांना शिक्षा झाली नाहीतर ते आणखी एक टोळी तयार करतील. आम्ही, या प्रकरणाबद्दल अजितदादांना जे सांगायचं आहे. ते सांगितलं. ते काय तो निर्णय घेतील. त्यांना काही माहिती लागली तर विचारशील. दादांनी, वैभवी हिच्या शिक्षणाबद्दल देखील विचारणा केली आणि कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेतली, असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 5:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case: अजितदादांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट, म्हणाले...







