Satara Accident: वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर ट्रिपलसीट गेले, मागून येणाऱ्या गाडीने घाटात उडवले; दोन सख्खे मित्र जागीच गेले

Last Updated:

Satara Accident: दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन घरी परतताना या दुचाकीला पिकअप गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

News18
News18
सातारा : साताऱ्यातील सज्जनगड घाट रस्त्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर गेलेल्या दोन सख्ख्या मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सज्जनगडाजवळच दुचाकीला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. दोघेही एकाच गावातले आणि मित्र होते. वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावे आहेत. दोघांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वडपाव खाण्याची इच्छा झाल्याने वेदांत आणि प्रज्वल सज्जनगडावर गेले. दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन घरी परतताना या दुचाकीला पिकअप गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोन जिवलग मित्र असलेल्या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही सज्जनगडापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडे बुद्रूक गावातील आहेत. दोघांची दहावीची परीक्षा नुकतीच दिली.
advertisement

गाडीने दिली मागून धडक

दोघेही लिफ्ट मागून गावातून सज्जनगडावर गेले होते. तेथे फिरून दोघांनी एकत्रच वडापाव खाल्ला आणि चालत घराकडे निघाले होते. वाटेतच त्यांना एक बाईक जाताना दिसली. त्यांनी त्यावरील चालकाला हात करून पुढे सोडण्यासाठी विनंती केली. बाईक चालकाने दोघांना गाडीवर बसवले. काही अंतरावरच घाट -वळण सुरू झाले, आणि पाठीमागून आलेल्या गाडीने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Accident: वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर ट्रिपलसीट गेले, मागून येणाऱ्या गाडीने घाटात उडवले; दोन सख्खे मित्र जागीच गेले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement