गवतावरून गाडी घसरली, ताबा सुटला, साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेले, कार ३०० फूट दरीत

Last Updated:

Satara News: वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ३०० फूट खोल दरीत गेली.

सातारा अपघात
सातारा अपघात
विशाल पाटील, सातारा: साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी थेट दरीत कोसळली घटना घडली आहे. जवळपास ३०० फूट एका झाडाला कार अडकली असून कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील साहिल जाधव हा 20 वर्षे युवक गंभीर जखमी झाला आहे.
गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ३०० फूट खोल दरीत गेली आहे. सुदैवाने फोटोसेशनसाठी त्याच्यासोबतचे चार मित्र गाडीतून खाली उतरल्याने ते सुखरूप आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

याबाबत पाटण पोलिसांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती अशी, सडा वाघापूर याठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक येथे जात असतात. पाटणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉईंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे. या टेबल पॉईंटच्या दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. याठिकाणी फोटोसेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात.
advertisement
बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव (वय २०. रा. गोळेश्वर, ता. कराड) हे आपल्या मित्रांच्या समवेत चारचाकी (क्र. एम. एच. ५०. एक्स. ५८५९) या गाडीतून पर्यटनासाठी आले होते. टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते. सायंकाळी ४.१५ च्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ते ३०० फूट खोल दरीत गाडीसह कोसळले.
advertisement
यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाटण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर, राजेंद्र मोहिते, होमगार्ड आकाश चव्हाण, दीपक मिसाळ आदी टीमसोबत अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरूल, ता. पाटण येथील किंगमेकर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले. यावेळी परिसरात बकरी चारण्यासाठी गेलेला युवक मंगेश जाधव (म्हावशी) याने सदर गाडीचा दरवाजा तोडला.
advertisement
गंभीर जखमी साहिल जाधव याला उपचारकरिता सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे पाठवण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गवतावरून गाडी घसरली, ताबा सुटला, साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेले, कार ३०० फूट दरीत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement