शाळेऐवजी 9 वर्षांच्या मुलीला लावलं भलत्याच कामाला, कराडमध्ये बापलेकीचे 6 महिन्यात 6 कांड, पोलीस चक्रावले!

Last Updated:

कराडमध्ये एका व्यक्तीने आपल्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलीला शिक्षणापासून दूर ठेवून वाईट मार्गाला लावलं. दोघांनी मिळून मागच्या सहा महिन्यांत सहा मोठे कांड केले.

AI Generated Image
AI Generated Image
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड: सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका बापाने आपल्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलीला शिक्षणापासून दूर ठेवून वाईट मार्गाला लावलं. दोघांनी मिळून मागच्या सहा महिन्यांत सहा मोठे कांड केले. हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावले. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी बापाला अटक केली आहे.
यशवंत काटवटे असे या आरोपी बापाचे नाव आहे. आरोपीने आपल्या मुलीला शाळेत पाठवण्याऐवजी रेकी करायला पाठवत असे. मुलीने रेकी केल्यानंतर आरोपी काटवटे तिथे जाऊन घरफोडी करत असे. बापलेकीचा हा कांड आता कराड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यान कराड शहर परिसरातील मलकापूर, कोयना वसाहत आणि कार्वेनाका येथे अनेक घरफोडीच्या घटना घडल्या. मात्र, आरोपींचा शोध लागत नव्हता. याप्रकरणी कराड शहर पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, एका अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बापावर संशय बळावला.
advertisement
पोलिसांनी या बाप-लेकीला ताब्यात घेतले असता, चौकशीदरम्यान त्यांनी सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत काटवटे हा आपल्या ९ वर्षांच्या मुलीला घरफोडी करायच्या ठिकाणाची रेकी करण्यासाठी वापरत होता. मुलगी दिवसभर घरांची माहिती गोळा करायची आणि त्यानंतर तिचा बाप रात्रीच्या वेळी घरात चोरी करत होता. या दोघांनी मिळून सहा ठिकाणी घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.
advertisement
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण २७.१ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
शाळेऐवजी 9 वर्षांच्या मुलीला लावलं भलत्याच कामाला, कराडमध्ये बापलेकीचे 6 महिन्यात 6 कांड, पोलीस चक्रावले!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement