Satara Loksabha : 'गाड्यांचा ताफा अन् कॅमेरामन' साताऱ्यातील उमेदवारीवरुन शंभुराज देसाईंचा टोला नेमका कुणाला?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी आज कराड येथे महायुतीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी अजित पवार गटाचे नेते गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे आज महायुतीचा मेळावा पार पडला. या महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील इच्छुक उमेदवारांचे कान टोचल्याचे पाहायला मिळाले. नुसता गाड्यांचा ताफा आणि चारदोन कॅमेरामन घेवून निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग आणि बूथ प्लॅनिंग करावे लागतं अशा शब्दात खडे बोल सुनावले आहे. सातारा येथून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंची उमेदवारी फिक्स
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळेल, असं भरसभेत जाहीर करून टाकले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे आणि पुढील 5 वर्षाने होणाऱ्या लोकसभेसाठी देसाई यांनी तयारी करण्याची मागणी शिवेंद्रराजे यांनी या सभेत केली आहे. तर दुसरीकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीच्या नेत्यांसमोर पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
advertisement
यावर खासदार उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्या भाषणाचा समाचार घेत तुम्ही शिवेंद्रराजे यांना मिसळ खायला घातली होती. पण मी या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना मिसळ खायला घालणार असल्याची मिश्किल टिप्पणी राजे यांनी केली आहे.
अजितदादांच्या आमदार गैरहजर
view commentsसाताऱ्यातील वाई येथील महायुतीच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील आणि त्याचे बंधू नितीन पाटील हे या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. आज कराड, वाई आणि सातारा तालुक्यात महायुतीच्या वतीने मेळावे होत असताना या मेळाव्याकडे अजित पवार गटानं पुर्ण पाठ फिरवल्याचं पहायला मिळाले. महायुतीकडून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी भाजप कडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे सातारा अजित पवार गटाचे जिल्ह्यातील नेते नाराज असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजप आणि खासदार उदयनराजे ही नाराजी कशी दूर करणार हे पहावे लागणार आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 08, 2024 5:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Loksabha : 'गाड्यांचा ताफा अन् कॅमेरामन' साताऱ्यातील उमेदवारीवरुन शंभुराज देसाईंचा टोला नेमका कुणाला?


