Devendra Fadnavis : राज ठाकरेंचं इंजिन महायुतीच्या यार्डात येणार? मोदींच्या सभेआधी फडणवीसांनी क्लिअर केलं
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे, पण मनसे महायुतीत येणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे.
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी भाजप तसंच महायुतीचे सगळेच नेते चंद्रपूरमध्ये दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूरमधल्या सभेआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे महायुतीमध्ये येणार का नाही? यावरच्या प्रश्नावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली आहे. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तेव्हापासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसेकडून लोकसभेच्या तीन जागांची मागणी केली गेली, यात दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकचा समावेश असल्याचं बोललं गेलं. यापैकी महायुतीने शिर्डीच्या जागेची घोषणा केली आहे, तर दक्षिण मुंबई आणि नाशिकचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही.
advertisement
राज ठाकरे काय बोलणार?
view commentsदरम्यान महायुतीमध्ये सहभागी व्हायच्या चर्चांवर राज ठाकरे हे उद्या म्हणजेच गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार आहेत. '९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! ', असा टिझर राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
April 08, 2024 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : राज ठाकरेंचं इंजिन महायुतीच्या यार्डात येणार? मोदींच्या सभेआधी फडणवीसांनी क्लिअर केलं


