पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक, पण तरीही होतंय कौतुक; साताऱ्यातील 'गोष्टींची शाळा' उपक्रमाची सर्वत्र चर्चा
- Reported by:Shubham Sharad Bodake
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना लुप्त होत चाललेली मोडी लिपी, त्याचबरोबर आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जातात. त्यामुळे शहरातून मुले या भागात जिल्हा परिषद शाळेत शिकायला येऊ लागले आहेत. असाच एक अनोखा उपक्रम आणि अनोखी शिक्षण पद्धती या शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांनी मुलांना शिकवण्यास सुरू केली आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील अतिशय दुर्मिळ, दुर्गम आणि दुष्काळी भागातील म्हणजेच माण तालुक्यातील विजय नगरच्या जिल्हा परिषद शाळेत मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे अनेक पुरस्कारही या जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले आहेत.
या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना लुप्त होत चाललेली मोडी लिपी, त्याचबरोबर आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जातात. त्यामुळे शहरातून मुले या भागात जिल्हा परिषद शाळेत शिकायला येऊ लागले आहेत. असाच एक अनोखा उपक्रम आणि अनोखी शिक्षण पद्धती या शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांनी मुलांना शिकवण्यास सुरू केली आहे.
advertisement
साताऱ्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेत बालाजी जाधव कार्यरत आहेत. विजय नगर शाळा एक शिक्षकी शाळा आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या 40 विद्यार्थ्यांना ते एकटेच शिकवतात. सर्व विद्यार्थ्यांना शिकवलेले चांगल्या रीतीने समजावे म्हणून धड्याचे रुपांतर त्यांनी गोष्टी स्वरुपात करुन सांगायला सुरुवात केली. काही आठवडे गोष्टी सांगितल्यावर विद्यार्थ्यांना चांगल्या आकलन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मुलांना गोष्टी तयार करायला सांगितल्या.
advertisement
त्यानुसार तीन आठवड्यात मुले स्वतः गोष्टी तयार करू लागले. मुले गोष्ट तयार करून लिहून वाचायला आणि इतरांना सांगायला लागली. गोष्टीचा हा उपक्रम विद्यार्थी अत्यंत मन लावून आणि प्रामाणिकपणे करत आहेत. यामुळे या गोष्टींच्या माध्यमातून मुलांच्या आकलन वाढले आहे. तसेच त्यांची क्षमताही वाढली आहे.
advertisement
गोष्टी लिहिण्यासाठी मुलांनी सुरुवात केली आहे. जिथे चुकेल तिथे बालाजी जाधव मुलांना मार्गदर्शन करतात. त्याचा फायदा होऊन मुले अल्पावधीतच स्वतः गोष्टी लिहू लागली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या क्षमतेनुसार गोष्टी लिहिण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी 50 ते 70 गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचबरोबर इतरांना सांगायलाही सुरुवात केली.
यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी गणिताच्याही गोष्टी करू लागले आहेत. त्यामुळे शिकणे आणि शिकवणे सुलभ झाले आहे. विद्यार्थी दोन-तीन शब्दांवरूनही गोष्ट तयार करतात. विद्यार्थ्यांमध्ये लेखन, भाषण कौशल्याचा विकास झाला आहे.
advertisement
Friendship Day 2024 : या ‘फ्रेंडशिप डे’ला बनवा घरच्या घरी बॅण्ड, फारच सोपी आहे पद्धत, VIDEO
पहिली ते चौथीपर्यंतचे 40 विद्यार्थ्यांना शिकवत असताना बालाजी जाधव यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. मात्र, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी आणि शिकवलेले समजावे यासाठी पाठाच्या गोष्टी तयार करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. अशा या अभिनव उपक्रमासाठी साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या या गोष्टींची शाळा उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Aug 03, 2024 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक, पण तरीही होतंय कौतुक; साताऱ्यातील 'गोष्टींची शाळा' उपक्रमाची सर्वत्र चर्चा








