Satara Doctor : 'पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलले तर...', सातारा महिला डॉक्टर प्रकरणात शशिकांत शिंदे आक्रमक, 'मी स्वतः जबाबदारी...'

Last Updated:

Shashikant Shinde On Satara Doctor Case : फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडू, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी आक्रमक टीका केली आहे.

Shashikant Shinde On Satara Doctor Case
Shashikant Shinde On Satara Doctor Case
Satara Women Doctor Case : फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मात्र पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार आहे. अशातच महिला डॉक्टरच्या भावाने गंभीर आरोप केले होते. महिला डॉक्टरवर रिपोर्ट बदलण्याचा दबाव होता, त्याला महिला डॉक्टरने विरोध केला होता, असा आरोप केला गेला आहे. अशातच आता शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणात मोठी जबाबदारी स्विकारली आहे. कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडू, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी आक्रमक टीका केली आहे.

मी स्वतः एसपींना बोलणार - शशिकांत शिंदे

सातारा येथे शासकीय सेवेत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यानं महिला डॉक्टर सोबत केलेल्या गैरकृत्याला आणि त्रासाला कंटाळून या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. या सर्व घटनेची माहिती घेण्यासाठी मी स्वतः साताऱ्याचे एसपी यांच्याशी संवाद साधणार आहे. या घटनेतील ससत्यता पडताळून कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडू, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
advertisement

रिपोर्ट बदलले जाणार नाहीत - शशिकांत शिंदे

मृत पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सतत दबाव येत असल्याचे माध्यमांकडून समजते परंतु याबाबत कोणतेही रिपोर्ट बदलले जाणार नाहीत याबाबत मी स्वतः काळजी घेणार आहोत, असं आश्वासन देखील शशिकांत शिंदे यांनी दिलंय. पोलिसांनी त्वरित या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि आरोपींवर कडक कार्यवाही करून पीडितेला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
advertisement

गोपाल बदने याला कधी अटक होणार?

दरम्यान, महिला डॉक्टर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती यामध्ये प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांची नावं लिहिली होती. पीएसआय गोपाल बदने याला कधी अटक होणार असा प्रश्न सुद्धा लोक विचारताना पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Doctor : 'पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलले तर...', सातारा महिला डॉक्टर प्रकरणात शशिकांत शिंदे आक्रमक, 'मी स्वतः जबाबदारी...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement