पंढरपूर टू बीड व्हाया सोलापूर...गेल्या 48 तासात PSI गोपाल बदने कुठं लपला होता? पोलिसांचा संशय ठरला खरा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PSI Gopal badane Arrested : पीएसआय गोपाल बदने दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्याने थेट पोलीस चौकीत हजेरी लावली.
Satara Women Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे होताना दिसत आहेत. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा पंढरपुरात शोध घेतला जात होता. निलंबित पीएसआय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी रात्री गोपाल बदने याचं पंढरपुरात लोकेशन मिळालं होतं. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला होता. अशातच आता गोपाल पंढरपुरात होता, अशी माहिती आहे.
पंढरपूर टू बीड व्हाया सोलापूर...
पीएसआय गोपाल बदने दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्याने थेट पोलीस चौकीत हजेरी लावली. बदने सोलापूरच्या काही पोलिसांच्या तो सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती देखील समोर आली होती. पोलिसांनी कुटूंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदनेला धक्का बसला अन् तो पोलीस चौकीत हजर झाला.
advertisement
संबंधित डॅाक्टर बरोबर काय संबंध होते?
पीएसआय बदने एका स्थानिक पत्रकाराला कळवून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. पीएसआय बदने याने मी कुठलाही बलात्कार केला नसल्याचा तपासात खुलासा केला. मात्र संबंधित डॅाक्टर बरोबर काय संबंध होते हे तो सांगत नसल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
सुट्टीच्या कोर्टात हजर करणार
दरम्यान, आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने सुट्टीच्या कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन होणार होतं. मात्र, फलटणमध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे फडणवीसांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कृतज्ञता समारंभ हा डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलेल्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पंढरपूर टू बीड व्हाया सोलापूर...गेल्या 48 तासात PSI गोपाल बदने कुठं लपला होता? पोलिसांचा संशय ठरला खरा!


