Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी! शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sharad Pawar : मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. यावर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आपल्या जाहीरनाम्यातच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले. तर आता भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय. यावरुन शरद पवार यांनी खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शदरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची साताऱ्यात सभा होत आहे. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या अशी मागणी होत आहे, आनंद आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे. संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी यासाठी केल्या आहेत. पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही. मोदींच्या राज्यात महागाई वाढली. भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काही केलं ते मोदी सांगत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली. यावेळी कॉलर उडवत शरद पवारांनी भाषणाचा शेवट केला.
advertisement
वाचा - कांदा निर्यातबंदी उठवली! राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना मोठं आवाहन, म्हणाले महायुतीचे सर्व उमेदवार
उदयनराजे भोसले यांचीही भारतरत्न देण्याची मागणी
view commentsमहाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीच झाले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरते वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याची सुचले नाही, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
April 27, 2024 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी! शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले..


