भाड्याच्या घरात सुरू केला व्यवसाय, 30 वर्षांची मेहनत अन् आज दिवसाला दीड हजारांची कमाई, साताऱ्याच्या महिलेची गोष्ट!

Last Updated:

साताऱ्याच्या शोभा विलास पेटकर यांनी संसार करत, मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण करत मागील 30 वर्षांपासून अधिक वर्षांपासून आपल्या राहत्या घरातून म्हणजेच भाड्याच्या घरातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

+
सोलापूर

सोलापूर प्रेरणादायी कहाणी

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : आज महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत. असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिला आपलांनी आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलं नाहीये. नोकरी, समाजसेवा किंवा उद्योगधंद्यातही महिला आज यशस्वीरित्या समाजाला प्रेरणा देत आहेत. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
शोभा विलास पेटकर असे या महिलेचे नाव आहे. लातूरमधून ही महिला आपल्या पतीसोबत मागील 40 वर्षांपूर्वी साताऱ्याला आली आणि तेथे त्या आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. अतिशय बिकट परिस्थितीत आपला संसार चालवत होत्या. मुला-मुलींचे शिक्षण त्याचबरोबर संसाराचा गाडा पती-पत्नी मिळून ओढत होते.
advertisement
पतीच्या कमाईवरून संसार चालत नसल्याने भाड्याच्या घरात व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय शोभा विलास पेटकर यांनी केला. यानंतर भाड्याच्या घरातूनच भडंग उपवासाचे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्ट शक्य करता येते, याचे सर्वोत्तम उदाहरण त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
advertisement
साताऱ्याच्या शोभा विलास पेटकर यांनी संसार करत, मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण करत मागील 30 वर्षांपासून अधिक वर्षांपासून आपल्या राहत्या घरातून म्हणजेच भाड्याच्या घरातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय सुरू करत असताना अवघ्या 500 रुपयांपासून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला 1 किलोच्या स्वरुपात सर्व पदार्थांचे साहित्य आणले आणि ते तयार करून व्यापारी ग्राहक यांना टेस्टसाठी दिले.
advertisement
दातांचे आजार होऊ नये, म्हणून काय घ्यावी काळजी; नुकसान टाळण्यासाठी ऑवर्जून फॉलो करा या टिप्स
टेस्टसाठी दिलेल्या व्यापारी आणि ग्राहकांना ते पदार्थ आवडले आणि त्यांनी मग त्यानंतर त्यांना ऑर्डर देण्यास सुरुवात केली. उपासाचे पदार्थ भडंग, बॉबी चिवडा, यांसारखे वेगवेगळे पदार्थ ग्राहकांना आवडू लागले. ग्राहक ते चवीने खाऊही लागले. या माध्यमातून त्या आज दिवसाला दीड हजार रुपये कमावत आहेत आणि याप्रकारे दिवसाला सरासरी दीड हजार रुपये म्हणजे महिन्याला 40 हजारांहून अधिक रुपये कमावत आहेत.
advertisement
भडंग आणि इतर पदार्थ तयार करून त्याची विक्री करून त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांची मुलगी इंजीनिअर झाली आहे. तर मुलगा उच्चशिक्षित आहे आणि एका चांगल्या कंपनीत कामालाही आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रबळ असे भांडवल नसले तरी छोट्या भांडवलातूनही व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यातून महिन्याला हजारो रुपये कमवता येतात, हे या यशस्वी उद्योजिका शोभा विलास पेठकर यांनी दाखवून दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
भाड्याच्या घरात सुरू केला व्यवसाय, 30 वर्षांची मेहनत अन् आज दिवसाला दीड हजारांची कमाई, साताऱ्याच्या महिलेची गोष्ट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement