दिवसभरात एका व्यक्तीने किती आहार घ्यावा?, रात्रीचं जेवणं नेमकं कसं असावं?, डॉक्टरांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यक्तीचं वय, लिंग, कामाचा प्रकार प्रकार बघून त्या व्यक्तीने किती अन्य घ्यावे, हे ठरवलं जातं. आपल्या आहारामध्ये सर्व गोष्टींचा समावेश हा असायलाच हवा. आहाराचा एक पिरॅमिड असतो.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्यापैकीच अन्न हे अत्यंत गरजेचे आहे. अन्न हे शरीरासाठी आवश्यकच असतं. अन्न जर घेतलं तरच आपण सर्व कामे करू शकतो. पण दिवसभरामध्ये प्रत्येक व्यक्तीने किती अन्न घ्यायला पाहिजे, म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरासाठी किती अन्नाची गरज आहे, तसेच आपल्या आहारामध्ये कोण कोणत्या गोष्टीचा समावेश असावा, याबाबत अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे अनेकदा व्यक्तीला विविध समस्यांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे याच विषयावर लोकल18 च्या टीमने आहारतज्ञ अलका कर्णिक यांच्याशी विशेष संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यक्तीचं वय, लिंग, कामाचा प्रकार प्रकार बघून त्या व्यक्तीने किती अन्य घ्यावे, हे ठरवलं जातं. आपल्या आहारामध्ये सर्व गोष्टींचा समावेश हा असायलाच हवा. आहाराचा एक पिरॅमिड असतो. या पिरॅमिडमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कर्बोदके, फॅट्स, विटामिन, मिनरल्स, ओमेगा या सर्व गोष्टींचा समावेश आहारात असायलाच हवा. तसंच जे लहान मुलं म्हणजे पहिली ते चौथी वर्गात शिकणारे, अशा मुलांना 400 ते 600 कॅलरीज या दिवसभरात त्यांच्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे आणि मोठ्या व्यक्तींसाठी 1400 ते 1600 कॅलरीज जाणं आवश्यक आहे.
advertisement
तुम्ही जितकी कॅलरीज घ्याल, तितकाच तुमचा व्यायामही असायला हवा. सकाळच्या आहारामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कडधान्य, कच्चा कांदा, कोवळी भेंडी, गवार या गोष्टींचा समावेश हा असायला हवा. त्याचबरोबर सलादचाही समावेश असावा. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये कम्पल्सरी भाकरी आणि एक पालेभाजी ही असायलाच हवी.
advertisement
तसेच तुम्ही प्रोटीनयुक्त खिचडीही खाऊ शकतात. त्यामध्ये भरपूर अशा पालेभाज्या घालून किंवा फळभाज्या घाल शकता. आहारात डाळींचा समावेश असावा. डाळी या सालासकट घ्यायला हव्या. असा तुमचा आहार हा दिवसभरात असायला हवा. या पद्धतीने जर तुम्ही दिवसभरात आहार घेतला तर निश्चितच तुम्ही तंदुरुस्त आणि आनंदी राहाल. नेहमी जेवण करताना आनंदी मनाने आणि प्रसन्न चेहऱ्याने जेवण घेतलं तर त्याचे पचनही चांगले होते आणि तुम्ही चांगलेदेखील राहता.
advertisement
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 02, 2024 3:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवसभरात एका व्यक्तीने किती आहार घ्यावा?, रात्रीचं जेवणं नेमकं कसं असावं?, डॉक्टरांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती