Satar Lok Sabha : दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन! उदयनराजेंची सातारकरांना भावनिक साद; म्हणाले..

Last Updated:

Satar Lok Sabha : साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचं राजकीय वैर संपल्याचे त्यांनी जाहीर केलं.

उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट
उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा येथे आज महायुतीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात एक मोठी घटना आज सातारकरांना पाहायला मिळाली. सातारा म्हटलं की खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहीत आहे. मात्र, आज दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन झालं. हे मनोमिलन निवडणुकीपर्यंत नसून कायम राहणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. यावेळी मेळाव्यात उदयनराजेंनी सातारकरांना भावनिक साद घातली.
उदयनराजेंचे सातारकरांना भावनिक साद
महायुतीचा मेळावा साताऱ्यातील शेंद्र या ठिकाणी होत असुन या मेळाव्यात उदयनराजे यांनी मनोमिलनावर भाष्य केलं आहे. जेव्हा तुमच्या निवडणुका येतात तेव्हा एकत्र येता ही भावना मनात येणं योग्य आहे. मात्र, आम्हाला अडचणी होत्या. कार्यकर्ते जपत असताना प्रत्येकाची पाठराखण करावी लागते. मात्र, आता हात जोडुन विनंती करतो हे मनोमिलन कायम स्वरुपी ठेवायचं असुन वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेवुन निर्धार आपल्याला करायचा आहे. उदयनराजे भोसले किंवा शिवेंद्रसिंहराजे यांना निवडुन आणा हा संकुचित विचार झाला. जिल्ह्याला गतवैभव आणायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. हे मनोमिलन फक्त खासदारकी किंवा आमदारकीसाठी नसुन सगळ्या निवडणुकांसाठी असेल असं उदयनराजे भोसले म्हणाले. यामुळं आता साताऱ्यात दोन्ही राजेंच जुळल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंची उमेदवारी फिक्स
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळेल, असं भरसभेत जाहीर करून टाकले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे आणि पुढील 5 वर्षाने होणाऱ्या लोकसभेसाठी देसाई यांनी तयारी करण्याची मागणी शिवेंद्रराजे यांनी या सभेत केली आहे. तर दुसरीकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीच्या नेत्यांसमोर पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
advertisement
यावर खासदार उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्या भाषणाचा समाचार घेत तुम्ही शिवेंद्रराजे यांना मिसळ खायला घातली होती. पण मी या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना मिसळ खायला घालणार असल्याची मिश्किल टिप्पणी राजे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satar Lok Sabha : दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन! उदयनराजेंची सातारकरांना भावनिक साद; म्हणाले..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement