Sharad Pawar : ईव्हीएम विरुद्ध बॅलेटचा मुद्दा तापणार, शरद पवारांचा आज मारकडवाडी दौरा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar In Markadwadi : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाला शरद पवार भेट देणार आहेत. आज सकाळी दहा वाजता शरद पवार मारकरवाडी ग्रामस्थांची भेट घेणार आहेत.
सोलापूर: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आज मारकडवाडी गावाला भेट देणार आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाला शरद पवार भेट देणार आहेत. आज सकाळी दहा वाजता शरद पवार मारकरवाडी ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील यावेळी त्यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावात झालेलं मतदान ग्रामस्थांना मान्य नाही. या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला होता.
advertisement
मात्र प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवर मतदान होऊ शकलं नाही. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावाला भेट देणार आहेत. या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यापेक्षा 160 मते कमी मिळाली आहेत. निकालानंतर ग्रामस्थांनी झालेले मतदान अमान्य करत शंका उपस्थित केली होती.
advertisement
मारकडवाडीत पवारांच्या दौऱ्याची तयारी...
मारकडवाडीत शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडी मधील नेत्यांचे फोटो बॅनरवर आहेत. स्थानिक आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचेही फोटो बॅनरवर आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांनी लावले बॅनर झळकावले आहेत.
विधानसभा निवडणुकीत काय झालेलं?
advertisement
मारकडवाडीत एकूण 2476 मतदान असून त्यापैकी 77 टक्के मतदान झाले. भाजपचे राम सातपुते यांना 1003 तर उत्तम जानकर यांना 843 मतदान पडलं. गेली तीन टर्म या गावातून जानकर यांनाच लीड मिळायचे. पण यावेळीच मला कमी मतदान कसं झालं असा प्रश्न जानकरांनी उपस्थित केला. या गावातील ग्रामस्थांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. या गावात धनगर समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 08, 2024 8:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : ईव्हीएम विरुद्ध बॅलेटचा मुद्दा तापणार, शरद पवारांचा आज मारकडवाडी दौरा