Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनादिवशीच पवारांना धक्का, बालेकिल्ल्यातील विश्वासू नेत्याने सोडली साथ!

Last Updated:

Sharad Pawar : वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित असताना दुसरीकडे त्यांना बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. शरद पवारांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्याने नेत्याने पक्षाला रामराम केला आहे.

News18
News18
पुणे/सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (10 जून) 26 वा वर्धापन दिन मोठ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित असताना दुसरीकडे त्यांना बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. शरद पवारांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्याने नेत्याने पक्षाला रामराम केला आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार गटाचे खासदार, आमदारांसह अनेक पदाधिकारी, नेते-कार्यकर्ते उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पवारांचा मोठा प्रभाव आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला.

बालेकिल्ल्यात धक्का...

advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे पाटणमधील नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या, त्या आज पुण्यातल्या विशेष कार्यक्रमात प्रत्यक्षात आल्या.
या प्रवेश सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले आणि भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. सत्यजितसिंह पाटणकर यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आले.
advertisement
पाटण मतदारसंघात पाटणकर कुटुंबाची अनेक दशके राजकीय पकड राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या घराण्यातील प्रमुख व्यक्तीचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रवेशामुळे पाटणमध्ये भाजपला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील गणितांवर याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
advertisement

पाटणकरांच्या प्रवेशाने समीकरणं बदलणार?

सत्यजितसिंह पाटणकर आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे पाटणमधील राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये पाटणमध्ये पहिल्यांदाच शंभूराज देसाई यांना विजय मिळाला होता. त्यानंतर सातत्याने देसाई हे विजय मिळवत असून विक्रमसिंह पाटणकर आणि त्यानंतर सत्यजित पाटणकर यांना पराभव स्वीकारवा लागला होता. आता भाजपमधील प्रवेशानंतर पाटणमधील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनादिवशीच पवारांना धक्का, बालेकिल्ल्यातील विश्वासू नेत्याने सोडली साथ!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement