Shirdi News :भाविकांच्या खिशावर भार! शिर्डी संस्थानाकडून साईबाबांच्या प्रसादाच्या दरात वाढ, नेमका निर्णय काय?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
Shirdi News : साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र मनात जपत शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये शिर्डी संस्थानांच्या निर्णयाने नाराजी पसरली आहे.
अहिल्यानगर: साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र मनात जपत शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये शिर्डी संस्थानांच्या निर्णयाने नाराजी पसरली आहे. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी प्रसाद म्हणून भाविक शिर्डी संस्थानचे लाडू घेऊन जातात. मात्र, आता या लाडूंचे दर महाग केले आहेत. साईबाबा संस्थानने नुकतेच प्रसाद लाडूचे दर वाढवत 30 रुपये केले आहेत.
शिर्डी संस्थानच्यावतीने साईबाबांचा प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. यापूर्वी 25 रुपयांत 3 लाडू मिळत होते. मात्र आता केवळ दोन लाडूंसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. “भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनानंतर मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र हा तोटा भाविकांकडूनच वसूल करणे योग्य आहे का, यावर चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे संस्थानने गोरगरिबांना परवडणारे 10 रुपयांचे एक लाडूचे पाकीट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे 25 रुपयांचे 3 लाडूचे पाकीट बंद केले आहे. आता केवळ ३० रुपयांचे दोन लाडू असलेले एकच “प्रीमियम” पाकीट उपलब्ध असेल. यामुळे परवडणारे पर्याय संपुष्टात आले आहेत. एका बाजूला मोफत भोजनालय, तसेच माफक दरातील चहा, कॉफी, दूध व नाश्त्याची योजना कौतुकास्पद ठरत असतानाच, प्रसादातून हिशेब जुळविण्याची कसरत भक्तांना पटत नाही.
advertisement
साई समाधीचे दर्शन घेऊन परतताना भाविक लाडू प्रसाद मोठ्या श्रद्धेने घरी घेऊन जातात. मात्र आता या प्रसादाची गोडी त्यांच्या खिशाला परवडणार की नाही, हाच खरा प्रश्न बनला आहे.
view commentsLocation :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 24, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi News :भाविकांच्या खिशावर भार! शिर्डी संस्थानाकडून साईबाबांच्या प्रसादाच्या दरात वाढ, नेमका निर्णय काय?


