Sanjay Gaikwad : मतदारांवर टीका करताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, '2-2 हजारात विकला गेलात तुम्ही, तुमच्यापेक्षा $%#& बऱ्या...''
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना उलटला आहे. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आहे.त्यानंतर मंत्र्यांनी आपआपल्या खात्याचा पदाभार घ्यायला सूरूवात केली आहे. त्यात आता एका सभेत बोलताना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराची जीभ घसरली आहे.
Sanjay Gaikwad Controversial Statement : राहुल खंडारे, बुलढाणा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना उलटला आहे. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आहे.त्यानंतर मंत्र्यांनी आपआपल्या खात्याचा पदाभार घ्यायला सूरूवात केली आहे. त्यात आता एका सभेत बोलताना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराची जीभ घसरली आहे. '2-2 हजारात विकला गेलात तुम्ही, तुमच्यापेक्षा $%#& बऱ्या, अशा शब्दात मतदारांवर टीका करताना शिंदेंच्या आमदारांचा तोल सुटला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रमात आपल्याला मतदान कमी मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली होती. तसेच आमदार गायकवाड हे यावेळी मतदारांवर भडकल्याचेही पाहायला मिळाले. तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे, दोन दोन हजारात विकले गेलात तुम्ही &%$#@ &%$$## असे म्हणत, तुमच्यापेक्षा &%$#@ बऱ्या..., अशा शब्दात संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत अपशब्द वापरले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
advertisement
दरम्यान संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना शिवसेना युबीटीच्या जयश्री शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते. जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मतं पडली होती. तर संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मतं पडली होती. त्यामुळे अवघ्या 841 मतांनी त्यांचा विजय झाला होता.या विजयानंतर देखील त्यांनी मतदारांवर राग काढला आहे.
advertisement
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार
दरम्यान याआधी देखील विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘70 कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लानिंग काँग्रेसने केली आहे. या मागासवर्गीय समाजाने 70 वर्ष काँग्रेसला सत्तेत ठेवलं, त्यांना चांगले दिवस आले, त्या समाजाला संपवण्याकरता हे निघाले आहेत. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्हाला करता येतात’, असा इशाराही संजय गायकवाड यांनी काँग्रेसला दिला आहे.
advertisement
राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं होतं. त्यावरच टीका करतांना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केलंय.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 05, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Gaikwad : मतदारांवर टीका करताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, '2-2 हजारात विकला गेलात तुम्ही, तुमच्यापेक्षा $%#& बऱ्या...''


