Sindhudurg Crime : आधी शाब्दीक वाद झाला मग चाकूने सपासप वार...सिंधुदुर्गात भंयकर घडलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान वाद झाला होता.त्यानंतर या वादाचे पुढे जाऊन हाणामारीत रूपांतर झाले होते.
Sindhudurg Crime :सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान वाद झाला होता.त्यानंतर या वादाचे पुढे जाऊन हाणामारीत रूपांतर झाले होते.त्यात एकाने या वादात चाकू काढत सपासप वार केले आहेत.त्यामुळे या हल्ल्यात 65 वर्षीय मोहम्मद अली सुलतान बागवान गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर त्यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा अधिकचा तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन भाजी विक्रत्यांमध्ये कोणत्यातरी मुद्यावर शाब्दीक चकमक झाले होती. या चकमकीचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले आहेत. कारण इरफान नावाच्या इसमाने मध्येच चाकू काढत 65 वर्षीय मोहम्मद अली सुलतान बागवान यांच्यावर सपासप वार केले.या हल्ल्यात मोहम्मद अली सुलतान बागवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाली होती. पण या इरफानने पळ काढला असल्याची माहिती आहे.या प्रकरणात आता पोलिसांनी इरफानचा शोध सूरू केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
मालवणच्या जंगलात विदेशी तरूणाचा सांगाडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका विदेशी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच मालवणच्या नांदोस गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हा सांगाडा एका नेपाळी तरुणाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या सांगाड्याजवळ पोलिसांना घड्याळ, बॅग आणि मोबाईल सापडला आहे. या साहित्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, हा तरुण नेपाळी असल्याचं समोर आलं असून तो कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.
सांगाड्याजवळ पडलेल्या वस्तुंच्या आधारे मयत तरुणाच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली आहे. आता हा तरुण मालवणच्या जंगलात कसा पोहोचला, त्याच्यासोबत नक्की काय घडलं? त्याने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? याची कसलीही माहिती पोलिसांकडे नाही. सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहेत. घटनेचा पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
Aug 13, 2025 10:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurg Crime : आधी शाब्दीक वाद झाला मग चाकूने सपासप वार...सिंधुदुर्गात भंयकर घडलं











