Sindhudurg News: मालवणात अजबच घडलं! तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू, पाहा व्हिडीओ...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sindhudurg News: मालवण तालुक्यातील देवली काळेथर गावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसे खास आहे. या गावाबद्दल सध्या पंचक्रोशीत कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रसाद पाताडे, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यातील देवली काळेथर गावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसे खास आहे. या गावाबद्दल सध्या पंचक्रोशीत कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. भजनीबुवा रवींद्र करलकर यांच्या घरी जन्मलेल्या एका कोंबडीच्या पिल्लाला तीन पाय असल्याचे लक्षात आल्यानंतर हे पिल्लू सध्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले आहे.
रवींद्र करलकर यांच्या घरातील कोंबडीने काही दिवसांपूर्वी अंडी दिली होती. त्यातून पिल्लांचा जन्म झाला. मात्र त्यातील एका पिल्लाकडे पाहिल्यावर घरातील सदस्यांचं लक्ष वेधलं गेलं, कारण त्या पिल्लाला दोन नव्हे, तर तीन पाय आहेत. पहिल्यांदा कोणी तरी नजर चुकवली असेल, असा समज झाला. पण नंतर बारकाईने पाहिल्यावर ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
या तीन पायांच्या पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. गावातील लोकांनी पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी भेट देण्यास सुरुवात केली आहे.
हे पिल्लू पूर्णतः सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच खेळतं, खातं आणि वावरतं. अतिरिक्त पाय असूनही त्याच्या हालचालींवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.
advertisement
दरम्यान, प्राणिशास्त्राच्या दृष्टीने हे एक Genetic mutation समजले जाऊ शकते. मात्र ग्रामीण भागात अशा घटना घडल्या की त्या अनेकदा अंधश्रद्धा आणि समजुतींशी जोडल्या जातात. सध्या हे तीन पायांचे पिल्लू देवली काळेथर गावासाठी एक विशेष आकर्षण बनले आहे.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
July 01, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurg News: मालवणात अजबच घडलं! तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू, पाहा व्हिडीओ...


