गोबर गॅसपासून स्वच्छतेपर्यंत: गोपुरीतला अनोखा उपक्रम

Last Updated:

अनेक गांधीवादी कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन काम सुरू केलंय. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे गोपुरी आश्रम.

+
News18

News18

सितराज परब - प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : गोपुरी आश्रमाची स्थापना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांनी 5 मे 1948 रोजी केली. स्वातंत्र्याच्या आगमनाची चाहूल लागताच महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, इंग्रजांनी खेडी मृतवत केली होती; तेथे पुन्हा उद्योगधंदे उभे करून खेड्यातील दारिद्र्य नष्ट करावे. याच उद्देशाने आप्पासाहेब आणि अनेक गांधीवादी कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन काम सुरू केलंय. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे गोपुरी आश्रम.
आश्रमाचे महत्त्वपूर्ण प्रयोग
गोपुरी आश्रमातून आप्पासाहेबांनी विविध नवनवीन प्रयोग केले. कोकणातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा विकास करण्यासाठी त्यांनी गोपुरीत पहिली गोशाळा सुरू केली. कोकणाच्या विकासासाठी फळबाग लागवड केली आणि मसाल्याच्या पिकांची लागवड आंतरपिक म्हणून सुरू केली. तसेच अन्नधान्य व भाजीपाला उत्पादनासाठी आधुनिक पद्धती कशा वापरता येतील, यावर त्यांनी प्रयोग केले.
advertisement
पावसाळ्यात ग्रामीण भागात पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी त्यांनी शौचालयाच्या विविध मॉडेल्स तयार केल्या आणि स्वस्तात शौचालये उभारून स्वच्छतेचा प्रसार केला. यामुळे आजारांचे प्रमाण कमी झाले.
गोबर गॅस प्लांटचे यशस्वी मॉडेल
कणकवलीतील गोपुरी आश्रमात त्यांनी पहिला गोबर गॅस प्लांट बांधला. हा प्लांट यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र आणि भारत सरकारने त्याचा प्रसार केला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना इंधनाचा स्वस्त व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला.
advertisement
आप्पासाहेब पटवर्धन यांचे योगदान आजही ग्रामीण विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सिंधुदुर्ग/
गोबर गॅसपासून स्वच्छतेपर्यंत: गोपुरीतला अनोखा उपक्रम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement