Navi Mumbai : सोशल मीडियावर प्रेमाचा सापळा! मुलीचा बनाव करून 15 वर्षीय मुलाला फसवलं, भेटीतच घडला धक्कादायक प्रकार

Last Updated:

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

News18
News18
नवी मुंबई : नवी मुंबईत सोशल मीडियाच्या गैरवापरातून घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामसारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचा वापर करून एका अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढत त्याचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुलीचा बनाव करून 15 वर्षीय मुलाला फसवलं
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा अवघ्या 15 वर्षांचा असून तो दहावीचा विद्यार्थी आहे. आरोपींनी अत्यंत हुशारीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर मुलीचे नाव आणि फोटो वापरले आणि त्या माध्यमातून मुलाशी ओळख वाढवली.
सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संवाद हळूहळू अधिक भावनिक होत गेला. आरोपींनी स्वतःला मुलगी असल्याचे भासवत प्रेम व्यक्त केले आणि मुलाचा पूर्ण विश्वास संपादन केला. काही काळ नियमित चॅटिंग केल्यानंतर, त्या आरोपीने त्याला भेटण्याचा आग्रह धरला. विश्वासात आलेला मुलगा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील नांदिवली परिसरात भेटण्यासाठी कॅबने गेला.
advertisement
मात्र तो ठिकाणी पोहोचताच चार तरुणांनी त्याला जबरदस्तीने पकडले आणि एका इमारतीतील खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. कुटुंबावर मानसिक दबाव टाकण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवत धमक्याही दिल्या.
मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान मुलाला नांदिवली परिसरात सोडणाऱ्या कॅब चालकाचा शोध घेण्यात आला. मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी एका संशयित खोलीवर छापा टाकला आणि मुलाची सुखरूप सुटका केली.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चारही आरोपींना अटक केली. घटनेनंतर पोलिसांनी पालकांना आणि तरुणांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai : सोशल मीडियावर प्रेमाचा सापळा! मुलीचा बनाव करून 15 वर्षीय मुलाला फसवलं, भेटीतच घडला धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
BMC Election: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागात
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर के

  • जागा वाटपाचा घोळ, इच्छुकांची असलेली मोठी संख्या यामुळे यादी जाहीर झाली नव्हती.

  • ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

View All
advertisement