43 व्या वर्षीही अविवाहित! सुपरस्टार्स ते बिझनेसमशी जोडलेलं नाव, आज इतक्या कोटींची मालकीण आहे 'देवसेना'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Anushka Shetty Networth : बाहुबलीमधील राजकुमारी देवसेना आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. हीच देवसेना खऱ्या आयुष्यात खूप श्रीमंत आहे. तिच्या लव्ह लाइफची चर्चा नेहमीच होत असते.
इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त झाली आहे. झीनत अमान, रेखापासून ते सुष्मिता सेनपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या प्रेमप्रकरणांनी त्यांच्या चित्रपटांसह चर्चेतही स्थान मिळवले आहे. पण तुम्हाला ती सुंदर अभिनेत्री जिचे नाव सुपरस्टार, क्रिकेटपटू आणि अगदी दोन व्यावसायिकांशी जोडले गेले आहे? वयाच्या 43व्या वर्षीही तिचं सौंदर्य तितकंच चिरतरूण आहे.
advertisement
advertisement
आपण जिच्याविषयी बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. इंडस्ट्रीत तिला स्वीटी शेट्टी असंही म्हणतात. अनुष्काचा अभिनेत्रीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. ती इंडस्ट्रीतील एक उच्चशिक्षित व्यक्ती आहे. तिने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी मिळवली. योगाचंही शिक्षण तिनं घेतलं आहे.
advertisement
अनुष्का शेट्टीने 2005 मध्ये 'सुपर' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती 'लक्ष्यम' आणि 'शोर्यम' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे एसएस राजामौली यांचe बाहुबली. या मालिकेतील 'राजकुमारी देवसेना' या भूमिकेसाठी तिने खूप लक्ष वेधले. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिला 'क्वीन ऑफ द इंडस्ट्री' म्हणूनही ओळखले जाते.
advertisement
advertisement
अनुष्काचं नाव आतापर्यंत नाव प्रभास, नागा चैतन्य, क्रिश जगरलामुडी आणि गोपीचंद, तसेच क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि दोन व्यावसायिकांशी जोडलं गेलं होतं. अनुष्काने मात्र कधीच यावर भाष्य केलं नाही की कधी त्याला दुजोरा दिला नाही. बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आणि प्रभासच्या अफेअरच्या बातम्या लग्नापर्यंत पोहोचल्या होत्या.
advertisement
advertisement










