सोलापूरमध्ये भाजप सुसाट;अवघ्या 23 वर्षांची तरुणी नगरसेवक बनली, आडम मास्तरांच्या कन्येचा दारुण पराभव
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोलापूर महापालिकेत आता भाजपची निर्विवाद सत्ता असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरमध्ये अवघ्या 23 वर्षांची तरुणी नगरसेवक बनली आहे
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी नोंदवत तब्बल 87 जागा जिंकल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नेतृत्व त्यांना आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे यांची मिळालेली खंबीर साथ यामुळे भाजपने सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सोलापूर महापालिकेत आता भाजपची निर्विवाद सत्ता असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरमध्ये अवघ्या 23 वर्षांची तरुणी नगरसेवक बनली आहे. 102 जागांचे संख्याबळ असलेलया सोलापूर महापालिकेतही अत्यंत रोमहर्षक, अटीतटीच्या आणि लक्षवेधी लढती झाल्या.
सोलापूर महापालिका निवडणुकीत यंदा अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असताना नव्या चेहऱ्यांनी यंदाची निवडणूक गाजवली आहे. या निवडणुकीत तरुण नेतृत्वाला जनतेने कौल दिला असून प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूजा श्रीकांत वाडेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अवघ्या 23 वर्षांच्या वयात पूजाने मतदारांचा विश्वास संपादन करत थेट विजयाची झेप घेतली.या प्रभागात त्यांच्यासमोर माजी आमदार आडाम मास्तरांच्या कन्येचे आव्हान होते.मात्र मतमोजणी १४८२३ विक्रमी मते मिळावी आडम मास्तर यांच्या कन्या अरुणा आडम माकपा ३५२६ यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त युवा मतदारांना या निवडणुकीत संधी दिली, पूजा श्रीकांत वाडेकर यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पॅनल विजयी झाले.
advertisement
पूजा वाडेकर काय म्हणाल्या?
पूजा श्रीकांत वाडेकर ह्या कमी वयाच्या उमेदवार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांवर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचे पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सांगितले
25 व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेविका होण्याचा मान
प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या उच्चविद्याविभूषित नगरसेविका मृण्मयी महादेव गवळी हिने वयाच्या 25 व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे. गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी यांची मृण्मयी ही कन्या आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये लेक्चरर आहे. भाषेवर वक्तृत्व आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नगरसेविका म्हणून मृण्मयी गवळी या सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार आहेत.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरमध्ये भाजप सुसाट;अवघ्या 23 वर्षांची तरुणी नगरसेवक बनली, आडम मास्तरांच्या कन्येचा दारुण पराभव








