Solapur: अवकाळी संकटात शेतकरी डुबला, लाखोंचं नुकसान, अडीच एकर मका पाण्यात, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Agriculture Loss: अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. पापरीतील शेतकऱ्याची काढणीला आलेली अडीच एकर मका भूईसपाट झाली.
सोलापूर – गेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. या पावासने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी सचिन सुरेश भोसले यांनी अडीच एकरात मक्याची लागवड केली होती. पण अवकाळी पावसामुळे मका भूईसपाट झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
पापरी गावातील शेतकरी सचिन भोसले यांनी अडीच एकरात मक्याची लागवड केली होती. मका लागवडीसाठी एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च केला होता. 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये मका पिकाची योग्य काळजी घेतली. मका पिकावर कोणताही रोग येऊ नये म्हणून सचिन भोसले यांनी वेळोवेळी फवारणी केली.परंतु वेळेआधी अवकाळी पाऊस आणि मान्सून धडकल्याने मका शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे अडीच एकरामध्ये लागवड केलेली मका चिखलमय झाली आहे.
advertisement
अडीच एकरातून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं. पण अवकाळी पावसामुळे सगळं पाण्यात गेलं. आता खर्चही अंगावर असल्याने आर्थिक अडचण निर्माण झालीये. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सचिन भोसले यांनी केलीये.
advertisement
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मक्यासह कांदा, केळी आणि इतर पिकांनाही फटका बसला असून शेतकरी संकटात आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 01, 2025 11:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur: अवकाळी संकटात शेतकरी डुबला, लाखोंचं नुकसान, अडीच एकर मका पाण्यात, Video