Diwali Shopping 2025: प्लास्टिक सोडा, सोलापुरात मिळतायेत मातीचे आकाश कंदील, किंमत किती?

Last Updated:

Diwali 2025: दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठा सजल्या असून बाजारात रंगीबेरंगी आकाश कंदील दिसत आहेत. सोलापुरात पर्यावरणपुरक मातीचे आकाश कंदील मिळत आहेत.

+
Diwali

Diwali 2025: प्लास्टिक सोडा, सोलापुरात मिळतायेत मातीचे आकाश कंदील, किंमत किती?

सोलापूर: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजार रंगीबेरंगी आकाश कंदील आणि इतर वस्तूंनी फुलले असून खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. बाजारात प्लास्टिक आणि काही इतर प्रकारचे आकाश कंदील मोठ्या प्रमाणात दिसतात. पण, सोलापूर शहरातील नीलम नगर येथे राहणारे विकास कुंभार यांनी मातीपासून आकाश कंदील बनवले असून विक्रीसाठी बाजारात आणले आहे. या संदर्भात अधिक माहिती विकास कुंभार यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापुरातील मातीच्या वस्तू बनवणारे विकास कुंभार यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. त्यांनी प्लास्टिकच्या कंदीलला पर्यावरणपूरक मातीचा पर्याय तयार केला आहे. विकास आणि त्यांचे भाऊ देविदास कुंभार या दोन्ही बंधूंनी मिळून हे पर्यावरणपूरक कंदील बनवले आहेत. मातीपासून बनवलेल्या आकाशदिवे व त्यावरील सुंदर नक्षीकाम, मनमोहक रंगसंगती, बहुरंगी एलईडी दिवे व सहजपणे घराबाहेर टांगून ठेवता येईल अशा पद्धतीने हे कंदील बनवले असून ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
मातीपासून बनवलेले आकाश कंदील ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. मातीच्या एका आकाश कंदिलाची किंमत 260 ते 370 रुपये पर्यंत आहे. तसेच विकास यांच्याकडे 30 रुपयांपासून पणत्या देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या दिवाळीत आकाश कंदील व पणती विक्रीतून 22 ते 23 लाख रुपये पर्यंतची उलाढाल होणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Diwali Shopping 2025: प्लास्टिक सोडा, सोलापुरात मिळतायेत मातीचे आकाश कंदील, किंमत किती?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement