IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा होण्यासाठी केलेला आधुनिक उपचार. उपचार सुरू करण्यापूर्वी आवश्यक तपासण्या, खर्च, वय, आरोग्य स्थिती आणि डॉक्टरांचा सल्ला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सोलापूर - वंधत्वाचा समाधान करणाऱ्या जोडप्यांसाठी उपयुक्त आणि प्रगत वैद्य प्रक्रिया म्हणजे आयवीएफ पण आयवीएफ चागलं की वाईट?आयवीएफ करताना वय किती असावे? असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉक्टर दिनेश बलकवडे उपसचिव उपसचिव महाराष्ट्रराज्य स्त्री आरोग्य संस्था यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
वंदत्वाचा समाधान करणाऱ्या जोडप्यांसाठी आयबीएफ च्या माध्यमातून गर्भधारणा करण्याची संधी वाढत आहे. ज्यांना गर्भधारणा होत नाही आणि आयवीएफ हाच एक मार्ग आहे, अश्या जोडप्यांना आयवीएफ द्वारे गर्भधारणा केलेलं चांगलंच आहे, यामध्ये वाईट काहीही नाही. जर गरज नसेल तर आयबीएफ करू नये. पण आयवीएफ अशा लोकांना वरदान आहे, ज्याच्या गर्भ नलिका बंद आहे. अंडाशयामध्ये बीजांची संख्या कमी झाली आहे. शुक्राणू ची संख्या अत्यंत कमी आहे, किंवा शुक्राणू ची संख्या शून्य आहे. अशा पेशंटसाठी आयवीएफ नक्कीच वरदाननीय आहे.
advertisement
आयवीएफ करत असताना आहे कायदेशीर वयाची मर्यादा
आयवीएफ कुठल्याही वयामध्ये करू शकतो. पण आज कायदेशीररित्या वयाच्या 21 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या स्त्रिया आयवीएफ करू शकतात. आणि वयाच्या 23 व्या वर्षापासून 55 वर्षापर्यंत पुरुष आयवीएफ करू शकतात. हा आपला भारतातला कायदेशीर नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच आपल्या देशामध्ये आयवीएफ केलं जातं.
एकदा आयपीएफ केल्यावर पुन्हा कधी करावं ?
जर आपलं आयबीएफ करण्याचं कारण री करेंट आहे किंवा गर्भनलिका बंद आहे,अशांना प्रत्येक प्रेग्नेंसी आयबीएफ पद्धतीनेच करावी लागते.काहीजणांना काही कारणास्तव लग्न होऊनही खूप वर्षे झाली पण गर्भधारणा होत नसेल किंवा कारण समजत नसेल अशा जोडप्यानी पहिली प्रेग्नेंसी आयवीएफ पद्धतीने करून घ्यावी. म्हणजे त्यांना वेळेमध्ये मूल होईल आणि दुसरी प्रेग्नेंसी नॅचरल पद्धतीने देखील होऊ शकते. एकदा आयपीएफ केलं तर पुन्हा आयवीएफ करावं लागतं असं काही नाही.
advertisement
नैसर्गिक गर्भधारणेसाठी उपाय
view commentsनैसर्गिक रित्या गर्भधारणेसाठी फर्टिलिटी कडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे व गरजेचे आहे. तसेच फर्टिलिटी बरोबर आरोग्याकडे हे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी एक चांगली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याकडे लक्ष देणे, फास्ट फूड कमी करणे, आरोग्यवर्धक गोष्टी कडे लक्ष देणं, फ्रुट्स, ड्रायफूट्स आणि प्रोटीन यासारख्या आहारांचं सेवन करण. त्याचबरोबर पाणी भरपूर पिणे. महत्त्वाचा म्हणजे दररोज किमान 45 मिनिट व्यायाम करणे. आठ तास झोप झाली पाहिजे. व सर्वात महत्त्वाचा म्हणजे व्यसनांपासून दूर राहणं.या सर्व गोष्टी जर केल्या तर नक्कीच नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. अशी माहिती डॉक्टर दिनेश बलकवडे यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 11:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती

