जन्नत-ए-फिरदौस अन् व्हाईट मस्क, रमजानसाठी सोलापुरात 288 प्रकारचं अत्तर, Video

Last Updated:

मुस्लिम समाजात रमजानमध्ये अत्तर आवर्जून वापरलं जातं. अगदी पाहुण्यांना गिफ्ट म्हणूनही या महिन्यात अत्तरच दिलं जातं.

+
जन्नत-ए-फिरदौस

जन्नत-ए-फिरदौस अन् व्हाईट मस्क, रमजानसाठी सोलापुरात 288 प्रकारचं अत्तर, Video

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर: सध्या मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. रमजानमध्ये अत्तराला महत्त्व असतं. त्यामुळे मुस्लिम बांधव आवर्जून अत्तराची खरेदी करत असतात. सोलापुरातील विजापूर वेस येथे मीना बाजार आहे. येथील बाजारात देश विदेशातील अत्तरांचे तब्बल 288 प्रकार उपलब्ध आहेत. अगदी 100 रुपयांपासून ते 1 लाखांपर्यंत 10 मिली अत्तर या ठिकाणी मिळतं.
advertisement
मुस्लिम समाजात अत्तराला महत्त्व
मुस्लिम समाजात रमजानमध्ये अत्तर आवर्जून वापरलं जातं. अगदी पाहुण्यांना गिफ्ट म्हणूनही या महिन्यात अत्तरच दिलं जातं. मस्क, व्हाईट मस्क, जन्नत-ए-फिरदोस अशा विविध प्रकारातील अत्तरांना नेहमीच पसंती दिली जाते. लहान बालकांपासून स्त्रिया आणि पुरुषही विविध प्रकारचे अत्तर खरेदी करतात. अगदी सौम्य सुगंध आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या अत्तराला अनेकांची पसंती असते.
advertisement
बाजारात 288 प्रकारचे अत्तर
सोलापुरातील बाजारात देश विदेशातील अत्तर मिळतं. हवाई सुंदरी, अरमान, जीदानअल पासू, ब्रूट, हिना, खश जनतुल, मजसुवा, मुखल्लत, कुल वॉटर, डीजे कौलर, मॅग्नेट, हजारो, ब्लॅकबेरी, सदफ, लबबॅक, सीआर सेवन, अल्फजोहरा, मोगरा, असे 288 प्रकारचे अत्तर बाजारात उपलब्ध आहे. मोगरा, रोज, आईस ब्राक डव्ह, लक्स हे अत्तर महिला वर्ग आवर्जून खरेदी करतो. अगदी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपये किमतीचे अत्तर या ठिकाणी उपलब्ध असून यंदा किमतीत 20 टक्क्यांची घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
कसे बनते अत्तर?
फुलांच्या पाकळ्या, मसाले, औषधी चंदनाच्या लाकडापासून व वनस्पतींच्या सालीपासून अत्तर बनवले जाते. तसेच ताज्या वनस्पतीजन्य पदार्थांपासून अत्तर तयार होते. मातीच्या मडक्याच्या ऊर्ध्वपातनातून अत्तर तयार केले जाते. अत्तर तयार करताना शक्यतो कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही. मसाल्यांसारख्या नैसर्गिक घटकांचे डिस्टिलिंग करून ते तयार केले जाते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
एका महिन्यात इतकी होते उलाढाल
"विजापूर वेस मीना बाजार रमजानच्या महिन्यात भरत असतो. या बाजारात 400 ते 500 विविध वस्तूंचे व अत्तराचे स्टॉल लागलेले असतात. 15 ते 20 लाखापर्यंत या अत्तराची उलाढाल होते. आमचे दुकान विजापूर वेस या परिसरात असून रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात अत्तराची विक्री होते. कस्टमरची जास्त मागणी अरमान अत्तर आहे. अरमान अत्तर हे महिन्यातून आपल्याला 10 ते 15 किलो लागते. रमजानच्या महिन्यात विविध देशातून अत्तर आमच्या दुकानात येत असतात," अशी माहिती अत्तर विक्रेते उमर शेख यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
जन्नत-ए-फिरदौस अन् व्हाईट मस्क, रमजानसाठी सोलापुरात 288 प्रकारचं अत्तर, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement