ना कागद, ना डायरी; दुधाचा हिशोब आता एका क्लिकवर, इंजिनिअर तरुणांनी बनवलं खास ॲप, Video

Last Updated:

आता दूध विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील हिशोबाचा घोळ कायमचा मिटणार आहे. सोलापुरातील दोघा इंजिनिअर तरुणांनी त्यासाठी खास दूध ईआरपी हे ॲप विकसित केलंय.

+
ना

ना कागद, ना डायरी; दुधाचा हिशोब आता एका क्लिकवर, इंजिनिअर तरुणांनी बनवलं खास ॲप, Video

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून काही क्षणांत होत आहेत. त्यामुळे या व्यवहारांत अचुकता आणि पारदर्शकताही आलीय. आता दूध विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील हिशोबाचा घोळ कायमचा मिटणार आहे. सोलापुरातील दोघा इंजिनिअर तरुणांनी त्यासाठी खास दूध ईआरपी हे ॲप विकसित केलंय. विशेष म्हणजे हे ॲप डेअरी मालक, दूध विक्रेते आणि ग्राहक या तिघांनाही वापरता येणार आहे.
advertisement
इंजिनिअर तरुणांनी बनवलं ॲप
सोलापुरातील सागर दुधनकर आणि अभिषेक लोमटे या दोघांनी आपल्या घरातील दैनंदिन दुधाचा हिशोब चोख ठेवण्यासाठी एक ॲप बनवलंय. तसं पाहिलं तर ही समस्या फार छोटी वाटते. पण त्यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. त्यावर उपाय म्हणून हे ॲप बनवण्यात आलंय. या ॲपच्या माध्यमातून दैनंदिन दुधाच्या नोंदी, बिल आणि हिशोब काही मिनिटांत करता येणार आहे, असे सागर दुधनकरने सांगितले.
advertisement
दूध ग्राहकांना मोफत ॲप
दूध ईआरपी हे ॲप डेअरी मालक, दूध विक्रेते आणि ग्राहक यांना वापरता येते. दूध ग्राहकांना हे ॲप मोफत वापरता येते. डेअरी मालक आणि घरोघरी दूध विक्री करणाऱ्यांना मात्र या ॲपसाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क दिवसाला दीड रुपया म्हणजेच वर्षाला 599 रुपये इतके आहे. परंतु, या शुल्कात दुधाशी संबंधित सर्व प्रकारचे हिशोब आणि मेसेज देवाण-घेवाणीची सोय ॲपमध्ये आहे.
advertisement
ॲप कसं करतं काम?
दूध ईआरपीमध्ये दुधाचा दैनंदिन हिशोब ठेवता येतो. ग्राहकांना दिवसाची दुधाची खरेदी आणि महिन्याचे बिल एका क्लिकवर मिळते. ॲपमध्ये डेटा सेव्ह होतो तसेच पीडीएफ स्वरुपात हा हिशोब मिळवता येतो. तर विक्रेते आणि डेअरी मालक यांना दैनंदिन नोंदी, हिशोब ठेवण्याची सोय ॲपमध्ये आहे. तसेच महिन्याच्या शेवटी अगदी काही मिनिटांत सर्व ग्राहकांचे बिल तयार करून त्यांना पाठवता येते. तसेच एखाद्या दिवशी दूध वितरण शक्य नसेल तर त्याबाबत मेसेजची देवाण-घेवाणही ॲपच्या माध्यमातून करता येते, असंही दुधनकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
ना कागद, ना डायरी; दुधाचा हिशोब आता एका क्लिकवर, इंजिनिअर तरुणांनी बनवलं खास ॲप, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement