100 बैलगाड्यांचा ताफा अन् पारंपरिक वाद्ये, सोलापुरातील रंगपंचमीला 150 वर्षांची परंपरा, Video

Last Updated:

सोलापुरात लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. 150 वर्षापासून लोधी समाज बांधवांकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.

+
100

100 बैलगाड्यांचा ताफा अन् पारंपरिक वाद्ये, सोलापुरातील रंगपंचमीला 150 वर्षांची परंपरा, Video

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापुरात लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. 150 वर्षापासून लोधी समाज बांधवांकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात फक्त लोधी समाजच नाही तर परिसरात राहणारे राजपूत समाज, तेली समाज, मोची समाज, मुस्लीम समाज इतर सर्व समाज बांधव मिळून अतिशय उत्साहात हा उत्सव दरवर्षी साजरा करतात. यातून एक सामाजिक बांधीलकी लोधी समाजाकडून जपली जाते. परंपरेनुसार होळी दहन पासून रंगपंचमी पर्यंत हा उत्सव चालतो. जवळपास 8 दिवस रंगपंचमी उत्साहाची तयारी लोधी समाज करत असतो.
advertisement
बैल गाड्यांचा ताफा अन् खास मिरवणूक
सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या लोधी समाजाच्या रंगपंचमी निमित्त शहरातून मोठी मिरवणूक निघते. या रंगाड्याच्या मिरवणुकीस मोठ्या उत्साहात बेडर पूल इथून सुरुवात करण्यात आली. लोधी समाज पारंपरिक पद्धतीने रंगपचमी साजरी करतो. जवळपास 100 बैलगाड्यांचा ताफा, त्याचबरोबर पारंपारिक वाद्य घेऊन लोकगीत गात ही मिरवणूक परिसरात फिरते. सबंध महाराष्ट्रात फक्त सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने अशी अनोखी रंगपंचमी साजरी होत असते.
advertisement
कशी साजरी होते रंगपंचमी?
हिंदू धर्मातील रंगोत्सव अर्थात रंगपंचमीचा सण यंदाच्यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोरोनामुळे गेल्या दोनवर्षी रंगपंचमीचा सण म्हणावा तसा साजरा झाला नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीचा उत्साह शहरात दिसून आला. शहरातील लोधी समाजामध्ये रंगपंचमी सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगपंचमीनिमित्त समाजाच्या वतीने लष्कर बेडर पूल या ठिकाणाहून रंग गाड्यांची मिरवणूक काढली जाते. यामध्ये शंभर बैलगाडी मिरवणूक मध्ये दाखल होत असतात.
advertisement
सोलापूर शहरालगत असणाऱ्या खेड्यांमधून या बैलगाड्या मागवल्या जात असतात. दुपारी दोन वाजता बालाजी मंदिरामध्ये आरती होऊन या रंग गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले श्री बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, माजी नगरसेवक रवीसिंग कय्यावाले भारतसिंग बडरूवाले आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते रंग गाड्यांची पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि माजी नगरसेवक रविसिंग कय्यावाले, नागनाथ शिवशिंगवाले यांनी रंगपंचमी निमित्ताने निघणाऱ्या रंग गाड्यांच्या मिरवणुकीचा इतिहास स्पष्ट केला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
100 बैलगाड्यांचा ताफा अन् पारंपरिक वाद्ये, सोलापुरातील रंगपंचमीला 150 वर्षांची परंपरा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement