Solapur News: पती की हैवान, पत्नीसोबत असं वागला, कोर्टानं दिली जन्मठेपेची शिक्षा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: कौटुंबिक वादातून सोलापूरच्या एकाने टोकाचं पाऊल उचलंलं. पत्नी गेली पण लेकीनं धडा शिकवला. आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
सोलापूर - कौटुंबिक वादातून कधीकधी टोकाचे पाऊल उचलले जाते आणि त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. अशीच काहीशी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे घडली. जानेवारी 2022 रोजी कौटुंबिक वादातून मैनुद्दीन शेख याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घातली. यामध्ये लतिफा मैनुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला. आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पती मैनुद्दीन शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शेख कुटुंब हे उत्तर सोलापुरातील कळमण येथे एकत्र राहण्यास होते. 13 जानेवारी 2022 रोजी आरोपी पती मैनुद्दीन शेख व लतिफा यांचे किरकोळ कारणावरून भांडण सुरू झालं. त्याच दिवशी आरोपी मैनुद्दीन शेख यांची मुलगी सोहेरा कयुम सय्यद ही बाळंतपणासाठी माहेरी कळमण येथे आली होती. तेव्हा मुलगा समीर याने घरात भांडण करू नका, अशी समज देत वडिलांना बाहेर जाण्यास सांगितले.
advertisement
मुलाने सांगितल्यानंतर मैनुद्दीन शेख हे घराबाहेर पडले. पण त्याच दिवशी दुपारी चार वाजता ते परत आले आणि पुन्हा लतिफा यांच्यासोबत शिवीगाळ करत भांडण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि लतिफा यांना घरातून ढकलत अंगणात आणलं. मैनुद्दीनने लोखंडी खुर्ची उचलून पत्नी लतिफा यांच्या डोक्यात घातली. त्यामुळे लतिफा खाली कोसळल्या तेव्हाही त्याने लाकडी काठीने लतिफाच्या डोक्यावर मारले.
advertisement
भांडण सोडवण्यासाठी सून यास्मिन पुढे आले असता मैनुद्दीन शेख हा धमकी देऊन पळून गेला. जखमी अवस्थेत लतिफा शेख यांना उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
साक्षीदार फितूर झाले पण...
या घटनेनंतर यास्मिन समीर शेख यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मैनुद्दीन शेख यांच्यावर भा.द.वि. 302, 506 अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले व साक्षीदार फिर्यादी यास्मिन ही फितूर झाली. परंतु मुलगी सोहेरा हिने साक्ष दिली.
advertisement
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोहेरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. कमले व तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने पत्नी लतिफा शेख यांच्या डोक्यात लोखंडी खुर्ची, लाकडी काठीने मारून खून केल्याप्रकरणी आरोपी पती मैनुद्दीन शेख यास दोषी धरून जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 22, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: पती की हैवान, पत्नीसोबत असं वागला, कोर्टानं दिली जन्मठेपेची शिक्षा!


