8 महिन्यांपूर्वी मृत्यू; बेवारस म्हणून अंत्यसंस्कार, अखेर प्रकरण उघड, पुरोहितांसोबत ससूनमध्ये काय घडलं?

Last Updated:

Sassoon Hospital News:पुरोहित यांचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ससून रुग्णालय (फाईल फोटो)
ससून रुग्णालय (फाईल फोटो)
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयात उपचार करण्यात आलेले प्रकाश पुरोहित हे बेपत्ता होते. भाजपचे शहर प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी त्यांचे सासरे प्रकाश पुरोहित यांना शोधण्यासाठी ससून रुग्णालयच्या प्रशासनाला पत्र पाठवले होते. अखेर प्रकाश पुरोहित यांचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गेली दोन महिने पुरोहित यांचा शोध घेण्यात येत असल्याचा दावा पुष्कर तुळजापूरकर यांनी केला आहे. पुरोहित यांना ससून रुग्णालयामध्ये 23 सप्टेंबर 2024 रोजी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर 4 डिसेंबर 2024 पर्यंत उपचार सुरू होते. ससून रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यानंतरही पुरोहित यांचे कोणीही नातेवाईक न आल्याने त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवण्यात आलं.
advertisement
पुरोहितांना ससून रूग्णालयातील उपचारानंतर गायकवाड यांच्या संस्थेकडेकडे सोपवलं होतं. मात्र त्यांना पुन्हा 12 फेब्रुवारी 2025 ला ससूनमध्ये सोडल्याचा त्यांचा दावा होता. गायकवाड यांनी त्यांना 12 फेब्रुवारीला ससूनमध्ये दाखल केलं, तेव्हा अज्ञात म्हणून रुग्णाची नोंद झाली होती. दरम्यान 7 मार्च रोजी रुगण्याचा मृत्यू झाला. दादासाहेब गायकवाड यांनी या रुग्णाला दाखल करताना तो बेवारस असल्याचं सांगितलं. त्यामुळे तो रुग्ण बेवारस असल्याचं समजून बंडगार्डन पोलिसांना कळविण्यात आलं आणि पोलिसांची कार्यवाही झाल्यानंतरच या रुग्णाची बेवारस म्हणून पुढे अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली. त्यामुळे ससूनमधून रुग्ण कसा बेपत्ता झाला? असा प्रश्न उपस्थित झाला.
advertisement
पुरोहित यांच्या पत्नीला शुक्रवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं. पुरोहित यांची ‘बेवारस मृत्यू’ म्हणून नोंद करताना काढलेले फोटो त्यांना दाखवण्यात आलं. यावरून पत्नीने त्यांची ओळख पटवली आहे. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
8 महिन्यांपूर्वी मृत्यू; बेवारस म्हणून अंत्यसंस्कार, अखेर प्रकरण उघड, पुरोहितांसोबत ससूनमध्ये काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement