Solapur : डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Last Updated:

Solapur MNS Balasaheb Sarwade Murder Case : फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शालन शिंदे यांनी मयत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतला.

Solapur MNS Balasaheb Sarwade Murder Case
Solapur MNS Balasaheb Sarwade Murder Case
Solapur Municipal Corporation Election : निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. अशातच या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

15 जणांवर गुन्हा दाखल

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शालन शिंदे यांनी मयत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतला, असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे आता पोलीस देखील तातडीने प्रकरणाता छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
advertisement

अर्ज मागे घेण्यावरून सुरू झाला वाद

या घटनेमागे राजकीय स्पर्धेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. भाजप उमेदवार शालन शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातीलच दुसऱ्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांच्यासोबत त्यांचा तीव्र वाद झाला होता. हा वाद अर्ज मागे घेण्यावरून सुरू झाला होता. या वादानंतर रेखा सरवदे यांनी आपला अर्ज तर मागे घेतला, मात्र हा वाद तिथेच थांबला नाही. त्यानंतर बाळासाहेब सरवदे यांची हत्याचं झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
advertisement

भाऊ पांडुरंग सरवदे यांची तक्रार

या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून बीएनएस कलम 103, 109, 189 (1), (2) आणि शस्त्र अधिनियमासह एकूण 13 कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
advertisement

सोलापूरात 102 जागांसाठी आता 737 उमेदवार

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांसाठी आता 737 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 1230 वैध अर्जांपैकी 493 उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता 26 प्रभागांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, आज या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती अत्यंत सावधपणे राबवली असून पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यात त्यांना मोठे यश आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर यांच्यात समन्वयाचे प्रयत्न यशस्वी झाले. यामध्ये प्रामुख्याने जगदीश पाटील, पांडुरंग दिड्डी, प्रभाकर जामगुंडे, परमेश्वर माळगे, श्रीकांत घाडगे आणि इंदिरा कुडक्याल या बंडखोर नेत्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना यश आले असून त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur : डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement