गरीब, वंचित, विद्यार्थ्यांसाठी सुरू केला क्लास, एकेकाळी एकच विद्यार्थी, आज 100 विद्यार्थी घेतायेत शिक्षण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहरात एक विद्यार्थी आणि दोन शिक्षकांपासून सुरू केलेले क्लासेसमध्ये आज 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज प्रवेश घेतला आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची सुरुवात करतो आणि आपल्या मेहनतीने, सातत्याने आणि जिद्दीच्या बळावर प्रामाणिकपणे प्रयत्न करत त्यात यशस्वी होतो. काही जण या प्रवासात खचतात. तर काही जण न खचता पुन्हा प्रयत्न करतात आणि ध्येयप्राप्ती करतात आणि समाजासाठी आपले योगदान देतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
सोलापूर शहरात एक विद्यार्थी आणि दोन शिक्षकांपासून सुरू केलेले क्लासेसमध्ये आज 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज प्रवेश घेतला आहे. उन्नती क्लासेस असे या शिकवणी वर्गाचे नाव आहे. या उन्नती क्लासेसची सुरुवात 2006 साली झाली. मुंतकिब इनामदार यांनी एका खोलीत या क्लासची सुरुवात केली. मात्र, आज याठिकाणी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आज होडगी रोड येथे उन्नती क्लासेस चालवले जातात.
advertisement
मुंतकिब इनामदार यांनी शाळेमधील नोकरी सोडून गरीब, वंचित, होतकरू विद्यार्थ्यांसाठी या क्लासेसची सुरुवात केली. या क्लासमध्ये कोणी लेडीज टेलरचा मुलगा आहे आहे, तर कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे. तर कोणी बांधकाम कामगाराचा मुलगा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे, अशा विद्यार्थ्यांनाही याठिकाणी प्रवेश दिला जात आहे.
advertisement
विशेष म्हणजे उन्नती अकॅडमीमधून पास पास होऊन गेलेले विद्यार्थी आज कोणी डॉक्टर आहे तर कोणी इंजीनिअर आहे. आपल्या हातून एक मजबूत भारत घडवावा, अशी इच्छा उन्नती अकॅडमीचे संचालक मुंतकिब इनामदार यांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केली.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
July 06, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
गरीब, वंचित, विद्यार्थ्यांसाठी सुरू केला क्लास, एकेकाळी एकच विद्यार्थी, आज 100 विद्यार्थी घेतायेत शिक्षण

