आनंद गगनात मावेना! गावातील एसटी बससेवेला एक वर्ष पूर्ण, गावकऱ्यांनी चक्क केक कापून वाढदिवस केला साजरा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. एसटी, ‘लालपरी’ तर कुणासाठी ‘लाल डब्बा’ अशी या एसटीची ओळख आहे.
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी आहे. पण आजही काही गाव आहेत. ज्याठिकाणी एसटी बस पोहोचली नाही आहे. असेच एक गाव म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी. या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी मागच्या वर्षी एसटी बससेवा सुरू करण्यात आली. यानंतर आता या बससेवेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर एसटीचा पहिला वाढदिवस गावकऱ्यांनी केक कापून साजरा केला.
advertisement
आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. एसटी, ‘लालपरी’ तर कुणासाठी ‘लाल डब्बा’ अशी या एसटीची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 75 वर्षांनी म्हणजे मागच्याच वर्षी पहिल्यांदा एसटी बस आली.
Sanket Gawhale : विदर्भाचा लाल पुन्हा जाणार रशियात, महिन्याभरात दुसऱ्यांदा आलं निमंत्रण
या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. त्यामुळे या गावात दळणवळणाचे एकमेव साधन म्हणून एसटीकडे बघितले जात होते. म्हणून आता या बससेवेला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे एसटीचा पहिला वाढदिवस गावकऱ्यांनी केक कापून साजरा केला. यावेळी केक कापून, फुगे लावून, तसेच नारळाच्या पारंब्या बांधून, धूमधडक्यात गावकऱ्यांनी हा वाढदिवस साजरा करत आनंद व्यक्त केला. यावेळी अबाल-वृद्ध, तरुण आणि महिलांचा मोठी उपस्थिती होती.
advertisement
एसटी सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी, कॉलेजचे तरुण, हॉस्पिटलला जाणारे वृद्ध आणि दूध व्यावसायिक, आठवडी बाजाराला जाणारे ग्रामस्थ प्रचंड आनंदी आहेत. त्यामुळे आता मैलोनमैल होणारी पायपीट थांबली असून 75 वर्षानंतर सुरू झालेली एसटी बंद करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
March 22, 2024 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आनंद गगनात मावेना! गावातील एसटी बससेवेला एक वर्ष पूर्ण, गावकऱ्यांनी चक्क केक कापून वाढदिवस केला साजरा VIDEO

