सातारा ते कोल्हापूर विशेष गाडी धावणार! पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर रेल्वेचा निर्णय
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : मागील काही दिवस राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सातारा, कोल्हापूर, सांगलीला रेड अलर्टमुळे पावसाचा जोरदार तडाखा बसला. पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, अनेक गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. एकूणच पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झालं, शेतकरी बांधवांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. शिवाय दळणवळणावरही पावसाचा परिणाम झाला. रेल्वेच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे नागरिक जागृत मंचानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली. त्यानंतर आता रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलंय. आता 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.
advertisement
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे 20 जुलैपासून कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. सध्या पूर ओसरला असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पुराच्या काळात सांगली, सातारा, कोल्हापुरात अनेक गावातील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या ज्या अजूनही बंद आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात पावसाच्या रिमझिम सरी सुरूच आहेत.
advertisement
तीनही जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी संपर्क क्रांती गाडी सांगली, भिलवडी, कराड, किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबवावी. तसंच किर्लोस्करवाडी आणि भिलवडी इथं आणखी 10 गाड्यांना थांबा देण्याची विनंती सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचानं केली होती. परंतु याबाबत रेल्वेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर नागरिक जागृत मंचानं थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वे विभागानं सातारा, सांगली, कोल्हापूर पूर विशेष गाडी सुरू केल्याचं बोललं जातंय.
advertisement
अशी धावणार सातारा ते कोल्हापूर गाडी 01412
view commentsदुपारी 2.20 वाजता सातारा, दुपारी 2.43 वाजता रहिमतपूर, दुपारी 2.53 वाजता तरडगाव, दुपारी 3.05 वाजता मसूर, दुपारी 3.15 वाजता शिरवडे, दुपारी 3.25 वाजता कराड, दुपारी 3.38 वाजता शेनोली, दुपारी 3.45 वाजता भवानीनगर, दुपारी 3.50 वाजता ताकारी, दुपारी 4 वाजता किर्लोस्कर वाडी, दुपारी 4.15 वाजता भिलवडी, दुपारी 4.23 वाजता नांद्रे, दुपारी 4.38 वाजता सांगली, दुपारी 4.43 वाजता विश्रामबाग, सायंकाळी 5.20 वाजता मिरज, सायंकाळी 5.35 वाजता जयसिंगपूर, सायंकाळी 5.50 वाजता हातकणंगले, सायंकाळी 6 वाजता रुकवडी, सायंकाळी 6.06 वाजता वळी वडे आणि सायंकाळी 6.35 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 07, 2024 9:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारा ते कोल्हापूर विशेष गाडी धावणार! पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर रेल्वेचा निर्णय


