फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, चौकशी केली पण...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे.
मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागात शेकडो मतदार ओळखपत्रे टॉयलेट फ्लश टँकमध्ये सापडल्याने निवडणुकीपूर्वी खळबळ उडाली होती. समाज माध्यमांवरून यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही.
advertisement
त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 6:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, चौकशी केली पण...


