Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार!
- Published by:Sachin S
Last Updated:
उद्या शनिवारी सकाळी राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. कार्यकर्ते अजूनही दुखातून सावरले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं सुचवण्यात आलं आहे. अखेरीस सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपला होकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या शनिवारी सकाळी राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे उपमुख्यमंत्रिपद आणि इतर पदं रिक्त झाली आहे. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून हालचालींना वेग आला आहे. मुंबईत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आण छगन भुजबळ नेत्यांनी बैठक घेतली. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. आता या भेटीनंतर उद्या शनिवारी मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्यास होकार दिला असल्याचं सांगण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये गटनेतेपदाची निवड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे.
advertisement
दुपारी होणार बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांची दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये गटनेतेपदाची निवड होणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळाची बैठक उद्या दुपारी दोन वाजता प्रदेशाध्यक्ष म्हणून मी निमंत्रित केलेली आहे. विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य आणि खासदार हे सर्व उपस्थित राहतील. उद्या दुपारी २ वाजता बैठक बोलावली आहे. या सर्वांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता उद्या निवडला जाईल. सुनेत्रा पवार यांच्याशी देखील आम्ही रात्री बोलणार आहोत, सुनेत्रा पवार यांच्याशी माझं बोलणं व्हायचं आहे, असंही तटकरे यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत दोन दिवस शुकशुकाट पाहायला मिळत होता. परंतु अस्थी विसर्जनानंतर शपथविधीचा कार्यक्रम उद्या शनिवारी होणार असल्याने बारामतीतील सहयोग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे.
(
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 7:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार!







